Lifestyle
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना ₹२,००० दिवाळी बोनस मंजूर; महिला व बालविकास विभागाकडून शासन निर्णय जारी

विशेष वृत्त : मुंबई
दिनांक : १५/१०/२०२६
जिल्हा रिपोर्टर : काशिनाथ देसले, ठाणे.
तालुका रिपोर्टर : किशोर पवार, मुरबाड
मुंबई : राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी राज्य शासनाने दिवाळीपूर्वी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना ₹२,००० ची दिवाळी बोनस (भाऊबीज भेट) अधिकृतपणे मंजूर करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने या कल्याणकारी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील एकूण २,१४,०९७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० मदतनिसांचा समावेश आहे.
४२ कोटींहून अधिक निधी मंजूर
या दिवाळी बोनस वाटपासाठी शासनाने एकूण ₹४२,८१,९४,००० (४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपये) चा भरीव निधी मंजूर केला आहे. ही संपूर्ण रक्कम दिवाळीचा सण सुरू होण्यापूर्वीच डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी संघटनांकडून मानधन वाढ आणि दिवाळी बोनसची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणे जिल्हा, मुरबाड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.