🔥 TRENDING Jaipur bans tourist bus entry to Amer... बेंगलुरु में परिवहन कर्मचारियों का विर... ग्राम पंचायत फतेहसागर: रेखा देवी ने सर... बिचोलिम में ‘सरकार तुमच्या दारी’ कार्य... खूबसूरत पंडाल हुनर से लिखी आत्मनिर्भरता की नई इबारत,...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जळगावात मोठा अनर्थ टळला; बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण....

जळगावात मोठा अनर्थ टळला; बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण....

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 17 Oct 2026, 04:26 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर उमटले आहेत. आदिवासी बांधव आणि मंत्री यांच्यातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक महाराणा प्रताप चौकाकडे वळविली होती. त्यामुळे महाराणा प्रताप चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

याच वाहतूक कोंडीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. कोंडीतून वाट काढण्याच्या घाईत एका दुचाकीस्वाराने भरधाव बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंदाज चुकल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट बसच्या पुढील चाकाखाली आला. क्षणात मृत्यू समोर दिसल्याने दुचाकीस्वाराला मोठा मानसिक धक्का बसला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बस चालकाने क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावले. त्यामुळे बस जागीच थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

त्याचवेळी चौकात वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांच्या मदतीने दुचाकीस्वार आणि त्याची दुचाकी बसच्या चाकाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आली.

सुदैवाने या घटनेत दुचाकीस्वाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. बस चालकाची सतर्कता आणि वाहतूक पोलिसांची तत्परता यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला असून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या धाडसी आणि सतर्क कृतीबद्दल बस चालकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
📲Get App