Local
भोरमध्ये दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी कबूतर प्रेमींचा अनोखा खेळ
Watch on:
▶️ YouTube
भोर, पुणे येथे दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी कबूतर प्रेमी अनोख्या खेळात भाग घेत आहेत, ज्यात रंगवलेल्या जातिवंत कबूतरांना आपल्या थव्यात घेण्यासाठी स्पर्धा केली जाते.

दिवाळीच्या काळात सर्व कबूतर ढाबळ मालक एकत्रित वर्गणी गोळा करून, विविध भागातून महागडी जातिवंत कबूतर खरेदी करून, त्यांना कलर देऊन गावकीच्या वतीने आकाशात सोडतात.
नंतर ढाबळ मालक आपल्या ढाबळीतील कबूतरांचा थवा आकाशात सोडतात आणि कलरवाली जातिवंत कबूतर आपल्या थव्यात घेण्याचा प्रयत्न करत स्पर्धा सुरू होते. शिट्या, ओरड आणि काळ्या झेंड्यांच्या मदतीने कबूतरांना मार्ग दाखवून हे खेळ खेळले जाते.
कलरवाली जातिवंत कबूतर आपल्या थव्यात घेणे हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. भाऊबीज दिवशी हा खेळ सुरू होतो आणि भाऊबीजपासून पुढे दोन ते तीन दिवस चालतो.
यंदा पुण्यासह दिल्ली व हैदराबाद येथून २०२ जातिवंत कबूतर आणण्यात आली व आकाशात सोडण्यात आली. संदीप पवार, दादू पवार व शांताराम पवार यांच्या मालकीच्या ढाबळ मालकांनी सकाळपासून पाच कलरवाली जातिवंत कबूतर पकडले. आपण त्यांच्याच ढाबळीवरील या सर्व खेळाचे चित्रण आमचे प्रतिनिधी किरण अंबिके यांनी केले आहे.