🔥 TRENDING गया में गोवर्धन पूजा पर निकली भव्य शोभ... लाखणी सड़क पर कार्य रुकने से यातायात म... 32 વર્ષના શાસનમાં ગુજરાતમાં ડ્રગ્સનું... वंदे भारत स्लीपरसाठी 'तात्काळ' आरक्षण... तिलक नगर में स्वाति गुप्ता की रंगोली न... Gujarat CM Meets Guv Devvrat, Engages...
10 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

वंदे भारत स्लीपरसाठी 'तात्काळ' आरक्षण नाही; दोन महिने आधीच तिकीट बुक करावे लागणार

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 10 Nov 2026, 08:40 PM 👁 4
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेससाठी आयत्यावेळी मिळणारा 'तात्काळ' आरक्षणाचा पर्याय उपलब्ध नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना नेहमीच्या नियमानुसार दोन महिने आधीच आगाऊ आरक्षण करावे लागणार आहे.

वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाची माहिती स्पष्ट केली आहे. या ट्रेनसाठी आयत्यावेळी मिळणारा 'तात्काळ' आरक्षणाचा पर्याय उपलब्ध असणार नाही. त्यामुळे वंदे भारत स्लीपरचे तिकीट हवे असल्यास प्रवाशांना नेहमीच्या नियमानुसार दोन महिने आधीच आगाऊ आरक्षण करावे लागणार आहे.

सध्या देशभरात हावडा ते कामाख्या, नवी दिल्ली ते वाराणसी आणि मुंबई ते बंगळुरू या तीन मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. तास १०० ते १८० किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचे डबे BEML ने चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'च्या तंत्रज्ञानाने तयार केले आहेत. १६ डब्यांच्या या ट्रेनमध्ये ११ डबे थर्ड एसी, ४ डबे सेकंड एसी आणि १ डबा फर्स्ट क्लास एसीचा समावेश आहे. या ट्रेनची एकूण प्रवासी क्षमता ८२३ असून, त्यात थर्ड एसीमध्ये ६११, सेकंड एसीमध्ये १८८ आणि फर्स्ट क्लास एसीमध्ये २४ प्रवाशांची सोय आहे.

रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार, केवळ पूर्णपणे कन्फर्म (वैध) आरक्षण तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाईल. वेटिंग लिस्ट, आरएसी (RAC) किंवा अंशतः कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करता येणार नाही. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करून आगाऊ आरक्षण करावे, म्हणूनच प्रीमियम सेवा असलेल्या या ट्रेनला तात्काळ तिकिटाचा पर्याय ठेवलेला नाही, असे स्पष्टीकरण उत्तर-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी दिले आहे.
📲Get App