🔥 TRENDING ફતેપુરામાં યસસ્વી વડાપ્રધાનના જન્મદિવસ... 2,500 Illegal PG Shops Uncovered in Ba... UPI नियमों के बदलाव से व्यापारियों में... BESCOM posts ₹293.62 crore profit desp... विश्वकर्मा पूजा में माँ पथरखणी की विशे... Ai
17 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

धडगावच्या अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक घटना; दहावीतील विद्यार्थिनीने संपवले जीवन....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 17 Sep 2026, 06:32 PM 👁 5
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धडगाव तालुक्यातील अक्राणी येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना धडगाव तालुक्यातील अक्राणी येथे घडली. येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यावाडी, जि. धुळे संचलित अनुदानित आश्रमशाळेत ही विद्यार्थिनी शिकत होती. मयत विद्यार्थिनीचे वय १५ वर्षे असून ती इयत्ता दहावीच्या वर्गात होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या विद्यार्थिनीने विषारी औषधाचे सेवन केले होते. तिला तात्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. पालकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

दरम्यान, या विद्यार्थिनीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
📲Get App