🔥 TRENDING ମୋହନଙ୍କ ଆକ୍ସନ: ଓଏଫଡିସିରୁ ବିଦା ହେଲେ ବିଷ... PGT शिक्षकों की भर्ती 2026: आवेदन 10 न... सालिगराम गैस एजेंसी कैमहरा उज्जवला गै... गुना जिले में लापरवाही दर्शाता वायरल व... BJP Accuses AAP of Ties to Punjab Drug... एमपीएल‑8 टूनामेंट का आरम्भ 7 नवंबर से,...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी केरसुणीची मागणी वाढली; पुण्यातील भोर बाजारात भाव कडाडले

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 05 Nov 2026, 12:28 PM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दिवाळी सण दोन दिवसांवर असल्याने पुण्यातील भोर बाजारात लक्ष्मी म्हणून पूजल्या जाणाऱ्या केरसुणीची मागणी वाढली आहे. यंदा केरसुणीच्या जोडीचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत ४० ते ५० रुपयांनी वाढून १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत.

दिवाळी सण दोन दिवसांवर असल्याने पुण्यातील भोर बाजारात लक्ष्मीपूजनासाठी केरसुणीची मागणी वाढली आहे. दिवाळीच्या सणाला ग्रामीण भागात लक्ष्मी म्हणजेच केरसुणीला अनन्यसाधारण महत्व असते. घरोघरी लक्ष्मीपूजनासाठी केरसुणीचे पूजन केले जाते, त्यामुळे सण आल्याने बाजारात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

केरसुणी खरेदीसाठी नागरिक बाजारात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यंदा केरसुणीचे भाव कडाडले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लक्ष्मीच्या जोडीमागे चाळीस ते पन्नास रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या बाजारात केरसुणीच्या जोडीला १६० ते २०० रुपयांमध्ये मिळत आहे. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनासाठी केरसुणीची गरज असल्याने नागरिक यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
📲Get App