🔥 ट्रेंडिंग वरिष्ठ महिलाओं को मूल आधार दिखाने पर म... जेलर 2 ने विदेश में रिकॉर्ड तोड़ कीमत... जैक्की शroff ने राम्या कृष्णन को 56वें... टी.डी.पी. और शिवसेना ने अमित शाह के यू... कांग्रेस ने सींग अपर मल्टीपर्पस प्रोजे... अरुणाचल में सियांग बांध सर्वेक्षण पर व...
16 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजनीति

ठाण्यातील डेटा सेंटर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा तीव्र विरोध

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 16 सित. 2026, 03:36 PM 👁 18
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ठाण्यातील डेटा सेंटर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा तीव्र विरोध; पर्यायी जागेची मागणीठाणे/मुरबाड:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील प्रस्तावित मेगा डेटा सेंटर प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या रहिवासी भागात हा प्रकल्प उभारण्याऐवजी त्याला तातडीने पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.स्थानिक संसाधनांवर ताण आणि प्रदूषणाचा धोकाआदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा तंत्रज्ञानाला विरोध नाही; मात्र बाळकुम येथील रहिवासी भागात ५३ एकरांवर उभारल्या जाणाऱ्या या २२ मजली प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या डेटा सेंटरमुळे २४ तास ९० ते ९५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे प्रदूषण होईल, तसेच कुलिंग प्लांटमुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊन पाण्याचा वापर वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प शहराबाहेर किंवा एमआयडीसीच्या 'रेड झोन'मध्ये हलवण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.रोजगार निर्मितीवरून उपस्थित केले प्रश्नचिन्हएवढ्या मोठ्या भूखंडावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून ठाणेकरांना नक्की काय मिळणार, असा सवाल त्यांनी केला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून केवळ १५० नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याने, स्थानिक संसाधनांवर ताण आणून ठाणेकरांच्या पदरात काहीच पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. आमचे सरकार सत्तेवर आल्यास ठाणेकरांच्या हितासाठी हा प्रकल्प शहरातून हद्दपार केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.जिल्हा प्रतिनिधी: काशिनाथ देसले, ठाणे.सिटीझन प्रतिनिधी: किशोर पवार, मुरबाड.दिनांक: १६/०९/२०२६
Need 24 न्युज.
📲Get App