🔥 TRENDING Congress Accuses AAP‑GFP Alliance of T... Jazeera Airways adds four new India‑Ku... KONKANIZ Platform Launched in Mangalur... एटा के औद्योगिक आस्थान उपकेंद्र में पर... Manipur U17 Boys Score 15-0 Victory in... ગઢશીશામાં LCBની જુગાર પર તવાઈ, 1 લાખથી...
16 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

तापी नदीपात्रात मृतदेह; रुमालाने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने शहाद्यात खळबळ

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 16 Sep 2026, 12:14 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे तापी नदीपात्रात एका युवक आणि अल्पवयीन युवतीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना हे मृतदेह दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह नदीबाहेर काढले. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेह एकमेकांना रुमालाने बांधलेल्या स्थितीत होते.

पोलिस तपासात दोघेही धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची आणि तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार आदल्याच दिवशी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेहांची ओळख पटवली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
📲Get App