🔥 TRENDING Odisha Issues Flood Alert as Heavy Rai... चक्रवर्ती तूफ़ान अरनव के अशर से हरदोई... Coastal Alert Issued for Odisha and An... Veteran IPS Officer N Balasubramanyam,... भगवान जागृत भव्य कार्यक्रम में श्रद्धा... Two engineering students killed after...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

शिंदखेड्यात श्री बालाजी महाराजांच्या १४८ वर्षांच्या परंपरेचा रथोत्सव उत्साहात सुरू!

✍️ Reporter: Kiran Madhukar Bhalekar 🗓 31 Oct 2026, 01:08 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बालाजी रथ उत्सवाला सर्वात

शिंदखेडा : सुमारे १४८ वर्षांची परंपरा आजतागायत अविरत सुरू आहे. आज दिनांक २६/१०/२०२६ अश्विन शरद पौर्णिमा रोजी रथोत्सवाला सुरुवात झाली. आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळलेल्या भव्य रथावर श्री बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान होताच ‘राधे रमणा गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा’च्या जयघोषाने शिंदखेडा नगरी दुमदुमली. ढोल- ताशांचा गजरात आणि घंटानादात पारंपरिक बालाजी रथोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेत रथ ओढण्याचा मान मिळविला. परंपरेनुसार आज (ता. २७) सायंकाळी सहाला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता रथ गल्लीतील श्रीराम बालाजी मंदिरात मठाधिपती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर वंशपरंपरेने पूर्व राऊळ राजघराण्याचे वंशज यांचेकडे प्रथम आरतीचा मान असून श्री. हिम्मतसिंह भीमसिंह राऊळ, गढी संस्थान शिंदखेडा यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली आणि रथ पालखी उत्सवाला सुरूवात झाली. श्री व्यंकटेशाची मूर्ती मठाधिपती मेघश्याम बुवा यांचे हस्ते रथाजवळ नेण्यात येऊन मठाधिपती, पंच मंडळी, रथ सेवेकरी, राजकीय नेते मंडळी, नगरपंचायत पदाधिकारी यांनी पूजा करत दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर बालाजी भगवान मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. दुपारी एक वाजता घंटानाद, ढोल-ताशांचा गजर आणि ‘राधे रमणा गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. रथमार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्री बालाजी महाराजांची आरती करून केळ्यांचा नैवेद्य अर्पण केला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक सुरू होती. गावात मेन रोडवर मिठाई, खेळणे व गृहसजावटीची दुकाने थाटात उभी होती. बुराई नदी पात्रात यात्रा भरली असून पाळणे इतर मनोरंजक दुकाने थाटली आहेत. शिंदखेडा गावाजवळील खेड्यावरून आपली कामे आटोपून अनेक ग्रामस्थ परिवारासह बालाजी महाराजांच्या दर्शनाला भेट देत होते. दर्शनाला अफाट जनसागर लोटलेला पहायला मिळत होता. त्यात रथ-पालखी पंचमंडळ श्री. हिंमतसिंह राऊळ, श्री. देविदास देसले, श्री. अरविंद देसाई, श्री. मंगा चौधरी, श्री. योगेश शिंपी व सहकारी श्री. उदय वानखेडे, श्री. जीवन भामरे, श्री. जयदेवसिंह राऊळ, श्री. बालाजी मित्र मंडळ यांचे नियंत्रण व व्यवस्थापनाचे काटेकोरपणे पालन होत होते. रथावर ब्रह्मवृंद प्रदीप दीक्षित, राहुल जोशी, सुहास जोशी, सोमनाथ पिले, धनंजय गिरासे, हेमंत जोशी, ललित पाठक, नंदकिशोर जोशी, संकेत कुलकर्णी, राम कुलकर्णी, कृष्णकांत गिरासे, देवेंद्र जोशी, मायू जोशी, धनंजय पाठक, अरविंद गिरासे, प्रदीप चतुर्वेदी आदी ब्राह्मण बांधव सेवा देत होते. रथाला गतिमान ठेवणे व त्यावर नियंत्रण राखण्याची जबाबदारी दयाराम माळी, अनिल लोहार, कोमलसिंह गिरासे, जीवन लोहार आणि गिरीश लोहार यांनी सांभाळली. घनकरी म्हणून मोतीराम बडगुजर, बारकू बडगुजर, अशोक बडगुजर, अभिमान मिस्तरी, उमाकांत मिस्तरी, दिलीप गिरासे, दादाभाई गिरासे, भगवान गिरासे, सुरेश माळी आदींनी सहकार्य केले. महावितरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त रथमार्गावरील विद्युत तारांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणच्या पथकाने विशेष काळजी घेत होते. सहाय्यक अभियंता भावेश टेटू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ जयेश पवार, सुनील खैरनार, संजय पाटील, राकेश पवार, मुकेश बोरसे, सुनील नगराळे, संतोष अहिरे, पांडुरंग पाटील, विशाल कोळी, प्रदीप बडगुजर, जावेद पठाण, जितेंद्र पाटील आणि राहुल गव्हाणे आदींनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
📲Get App