🔥 TRENDING सड़क हादसे में दो युवकों कि हुई मौत From Vijaykumar Patil GeM Portal Purchases to Face Strict Pr... Education Officer in Jhabua Caught Acc... Fire engulfs Jaipur gold jewellery fac... Rajasthan launches crackdown campaign...
22 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

शिरूरमध्ये बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 22 Oct 2026, 06:33 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्य आयोजक श्री. सचिन शिवाजी मल्लाव

शिरूरमध्ये बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार

शिरूर शहरातील काची आळी येथे श्री संत सदगुरु बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव. शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. पाण्याच्या टाकीजवळ आयोजित या सोहळ्यात सकाळी 9:30 वाजता व सायंकाळी 7 वाजता आरती. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दिवाणजी मल्लाव. व पुणे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांच्यासह पदाधिकारी व भक्तगण उपस्थित राहणार आहेत.

मुख्य आयोजक श्री. सचिन शिवाजी मल्लाव यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
📲Get App