🔥 ट्रेंडिंग वारिसलीगंज में बिजली पोल पर शॉर्ट सर्क... બોલિવૂડ અભિનેતા નાની પાટેકરનું નિધન: 7... आंवला तहसील में तेज़ ओले ने किसानों की... મહાન અભિનેતા નાના પાટેકરનું 75 વર્ષની... टीवीके ने राहुल गांधी की गिरफ्तारी की... ભારતીય જનતા પાર્ટીનું માલધારી મહા સંમે...
08 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ वकिलाची ७ लाखांत फसवणूक; एकाला अटक....!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 08 अक्टू. 2026, 06:46 AM 👁 12
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील ज्येष्ठ महिला वकिलाची ७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

रामदास कॉलनी परिसरातील रहिवासी अॅड. तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३) या फिर्यादी आहेत. त्यांच्या ओळखीतील प्रीती पाटील यांनी आपला मुलगा अतुल पाटील आणि सून जयश्री पाटील हे शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेकांना नफा मिळवून देतात, असे सांगितले होते. त्यानंतर अतुल आणि जयश्री यांनी भिरूड यांना गुंतवणुकीबाबत माहिती दिली.

विश्वास बसल्याने अॅड. भिरूड यांनी ३० एप्रिल रोजी अतुल पाटील याच्या बँक खात्यात १ लाख ५० हजार रुपये पाठवले. सुरुवातीला त्यांना काही दिवस परतावा देण्यात आला. त्यामुळे विश्वास वाढल्याने त्यांनी पुन्हा २ लाख रुपये आणि त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या रकमा अशा एकूण ७ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले.

मात्र, त्यानंतर ठरल्याप्रमाणे परतावा देण्यात आला नाही. दिलेले धनादेशही न वटता परत गेले. पैशांची मागणी केल्यावर उलट धमकावण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी अॅड. भिरूड यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अतुल भास्कर पाटील (रा. बांभोरी, ता. धरणगाव), जयश्री पाटील आणि सुरेखा पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी संशयित अतुल पाटील याला मंगळवारी, ६ रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत.
📲Get App