🔥 TRENDING ఆదిలాబాద్: రాత్రి ఘోర రోడ్డు ప్రమాదం સુરતમાં વિકસિત ભારત કાર્યક્રમમાં પ્રધા... నేడు ఆదిలాబాద్ లో సందడి చేయనున్న హీరోయ... सैदपुर में धान की फसल कटिंग कर स्थलीय... ప్రతి ఇంటికీ సురక్షిత తాగునీరు: కలెక్ట... ट्रैफिक नियमों की अनदेखी: सिग्नल और क्...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सावदा घाटात खासगी बस उलटली; २ ठार, ६ जखमी....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 07 Oct 2026, 10:14 AM 👁 13
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

नाशिक - नाशिक-गुजरात महामार्गावरील करंजाळी-सावदा घाटात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. नाशिकहून अहमदाबादकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसचा चालकाला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली.

या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची ओळख महेंद्र पाल आणि राहुल ओझा अशी झाली असून दोघेही गुजरातचे रहिवासी असून घरी परतत होते. एका प्रवाशाचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभागाचे पथक आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. पोलिसांनी बसच्या खिडक्या, दरवाजे आणि छतावरील एसीचे व्हेंट तोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

जखमींना तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालय आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
📲Get App