🔥 TRENDING ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ವಕೀಲರ ಪ್ರತಿಭಟನೆ रजौली के भड़रा में 220.745 एकड़ औद्योग... Goa CM Announces Day Passes for Goans... Vande Bharat Express from Bengaluru to... Bombay HC Orders Election Commission t... Manipur Board Unveils 2027 Practical E...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
साखरपा बसस्थानकावर २.६५ लाखांच्या दागिन्यांची चोरी
Crime

साखरपा बसस्थानकावर २.६५ लाखांच्या दागिन्यांची चोरी

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 18 Sep 2026, 12:48 PM 👁 91
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

१६ सप्टेंबर रोजी साखरपा बसस्थानकावर बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने विनिता अवसरे यांच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी अशा २.६५ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली.

१६ सप्टेंबर रोजी सकाळी साखरपा बसस्थानकावर बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने विनिता विकास अवसरे (वय ४८, गृहिणी) यांच्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी अशा तब्बल २.६५ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली.

विनिता अवसरे सध्या रा. परळ, मुंबई येथे राहतात आणि मूळ रा. प्रभानवल्ली, वाणेवाडी, ता. लांजा येथील आहेत. त्या आपल्या पतीसह अंत्रवली, ता. संगमेश्वर येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. कोल्हापूर ते संगमेश्वरमार्गे चिपळूण जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारला.

चोरट्याने अंदाजे पाच तोळे वजनाचे, सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सुमारे साडेतीन ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीस घेतली. घटनेनंतर अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करता आली नाही. १७ सप्टेंबर रोजी रात्री ८.५१ वाजता त्यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
📲Get App