🔥 ट्रेंडिंग જૂનાગઢના સોંદરડા GIDCમાં લોખંડના એંગલન... বিজেপি কেন্দ্রীয় প্রতিমন্ত্রী সুকান্ত... ಭೀಮಾ ನದಿಗೆ ನೀರು ಯಾವಾಗ? ಕರ್ನಾಟಕ–ಮಹಾರಾಷ್... मोतिहारी में किराना दुकान गोदाम में हु... ஸ்ரீவில்லிபுத்தூர்ஆற்றில் ஏற்பட்ட வெள்... विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स...
24 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

रामय्यापेठा गावाजवळ महामार्गावर डंपर आढळला; चालक बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

✍️ रिपोर्टर: DR:PINTU PAUL 🗓 24 अक्टू. 2026, 06:23 PM 👁 48
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रामय्यापेठा गावाजवळ महामार्गावर डंपर आढळला; चालक बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

रामय्यापेठा गावाजवळ महामार्गावर डंपर आढळला; चालक बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

मूलचेरा, जि. गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातून मूलचेराकडे जाणाऱ्या मार्गावर रामय्यापेठा गाव ओलांडल्यानंतर उजव्या बाजूला MH 33 T 2595 क्रमांकाचा डंपर अत्यंत अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, डंपर चालकाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याची शक्यता असून, डंपर चालक जिवंत आहे की त्याच्यासोबत काही अनुचित घटना घडली आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, संबंधित आरोग्य केंद्र तसेच इतर दवाखाने व रुग्णालयांमध्ये चालकाबाबत चौकशी करण्यात आली; मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याचे समजते. त्यामुळे चालकाने एखाद्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले असावेत, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

डंपर चालक नेमका कुठे आहे, हा अपघात कसा घडला आणि घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास अहेरी पोलीस करीत आहेत. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
📲Get App