पारगाव शिंगवे येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांचे अभिवादन! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News
Watch on:
▶️ YouTube
पारगाव (शिंगवे) : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पारगाव शिंगवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवर व शिवसैनिकांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य काळुरामशेठ लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंगशेठ देवडे, ग्रामपंचायत सदस्य वीरेंद्र ढोबळे, चेअरमन शिवाजी नाना ढोबळे, शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत लोखंडे, ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजणे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. मराठी माणसाच्या हक्कांसाठीचा संघर्ष, हिंदुत्वाची ठाम भूमिका आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेची भूमिका समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. अभिवादनाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.