🔥 TRENDING ఆదిలాబాద్: రాత్రి ఘోర రోడ్డు ప్రమాదం સુરતમાં વિકસિત ભારત કાર્યક્રમમાં પ્રધા... నేడు ఆదిలాబాద్ లో సందడి చేయనున్న హీరోయ... सैदपुर में धान की फसल कटिंग कर स्थलीय... ప్రతి ఇంటికీ సురక్షిత తాగునీరు: కలెక్ట... ट्रैफिक नियमों की अनदेखी: सिग्नल और क्...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; दुचाकी-ओमनीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी....

पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; दुचाकी-ओमनीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी....

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 07 Oct 2026, 10:14 AM 👁 6
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

पाचोरा - लोहारा मार्गे आंबेवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळमसरा-कुऱ्हाड टी पॉइंटवर आज सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास दुचाकी व ओमनी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये तरुण समाधान लक्ष्मण क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत असलेली एक महिला (दोघेही रा. लोहारा, ता. पाचोरा) यांचा समावेश आहे. अपघातानंतर दोघांनाही तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ओमनी चालक जखमी असून तो कळमसरा येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी गेल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH-19 CF-0648 क्रमांकाची ओमनी कार पहूर येथून कळमसरा मार्गे कुरंगी गावाकडे जात होती. त्याचवेळी MH-19 DR-9666 क्रमांकाच्या प्लॅटिना दुचाकीवरून समाधान क्षीरसागर व महिला लोहारा येथून आंबेवडगाव मार्गे कोल्हे येथे जात होते. कळमसरा-कुऱ्हाड टी पॉइंटवर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की, ओमनी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाच्या दरवाजाजवळ आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडलेले दिसून आले. दुचाकीचा देखील चक्काचूर झाला असून ती उडून बाजूच्या नालीमध्ये पडली होती.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल तात्याबा नागरे, शांतीलाल पगारे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद वाळले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी औट पोलीस पोस्टला आणण्यात आली आहेत.
📲Get App