🔥 TRENDING गोपालपुर थाना क्षेत्र में जकरियापुर मे... Homebuyer Wins Court Relief in Maharas... Bank of Maharashtra Q1 profit jumps 27... Police clash with robber gang in Uttar... Uttar Pradesh CM Yogi says ‘bhai‑bhati... Congress appoints new media chief for...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नदीतील पुराच्या पाण्यात उडी घेतलेल्या ३५ वर्षीय महिलेचा शोध संपला मृतदेहावर; परिसरात शोककळा....!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 19 Sep 2026, 07:02 PM 👁 6
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव, दि. १९ - जळगाव जवळील बांभोरी पुलावरून पुराच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवलेल्या महिलेचा मृतदेह अखेर तब्बल तीन तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भिकमचंद नगर येथील रहिवासी जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५) यांनी शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बांभोरी पुलावरून नदीच्या पुरात उडी घेतली होती. घटना समजताच बांभोरी गावातील काही तरबेज पोहणाऱ्यांनी रात्रीच्या अंधारातच नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची प्रचंड खोली, वेगवान प्रवाह आणि दाट अंधारामुळे त्यांना यश आले नाही.

या घटनेचे गांभीर्य ओळखून उपमहापौर मनोज चौधरी यांनी शनिवारी सकाळी ७ वाजता मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी ९.३० वाजता लाईफ गार्ड, लाईफ रिंग आणि बिलायती हुकच्या साहाय्याने बचाव पथकाने शोधकार्याला सुरुवात केली. पुलाच्या पिलरजवळ पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात होता आणि खोली १५ फुटांहून अधिक असल्याने हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचे बनले होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी ११.१० वाजता जवान रवींद्र बोरसे यांना पिलरजवळ खोल पाण्यात मृतदेहाचा अंदाज आला. त्यांनी एक क्षणही न दवडता पाण्यात उडी घेत बिलायती हुकच्या मदतीने मृतदेह बाहेर खेचून आणला. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.

या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी, चिराग वाघ यांनी अग्निशमन दलाला मोलाचे सहकार्य केले. तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेच्या शोध पथकातील गणेश सपकाळे, रवी भोई, नीलेश कोळी, दिनेश सपकाळे, योगेश गालफाडे, हेमराज सपकाळे यांनीही पाण्यात उतरून मदत केली.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर तातडीने जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला, जिथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी जयश्री चौधरी यांना मृत घोषित केले.
📲Get App