🔥 ट्रेंडिंग नगर परिषद मोहना में अमृत 2.0 योजना का... મુખ્યમંત્રી ભૂપેન્દ્ર પટેલની ઉપસ્થિતિમ... કોટલાવ ગામમાં ગણપતિ બાપાને 56 ભોગ ધરાવ... સચીન પોલીસ સ્ટેશનના ૧૮ લાખની છેતરપિંડી... વિરપુર ગામમાં દરગાહનો ઉર્સ યોજાયો गुरुवार को दिल्ली की हवा मध्यम, एनसीआर...
24 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
नेरी बुद्रुकमध्ये पत्ता क्लबवर धाड; 14 दुचाकी जप्त, बोर्हाडे यांच्या कारवाईने जामनेरात खळबळ...!!

नेरी बुद्रुकमध्ये पत्ता क्लबवर धाड; 14 दुचाकी जप्त, बोर्हाडे यांच्या कारवाईने जामनेरात खळबळ...!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 24 सित. 2026, 03:52 PM 👁 6
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे सुरू असलेल्या पत्ता क्लबवर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांचा ताफा येताच क्लबमध्ये पत्ते खेळणाऱ्यांची धावपळ उडाली. दृश्य एखाद्या सिनेमातील पाठलागासारखे होते.

या कारवाईत पोलिसांनी 14 मोटारसायकली, मोबाईल फोन आणि पत्त्यांचे साहित्य जप्त केले असून, खेळताना आढळलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या धडकेनंतर जामनेर तालुक्यात एकच चर्चा आहे - "पोलिसांचा ताफा पुढे कुठे जाणार?" आणि "आज नेरी बुद्रुक... उद्या कोणते गाव?"

नागरिकांची अपेक्षा आहे की, कारवाई फक्त खेळणाऱ्यांवर न होता क्लब चालवणाऱ्यांवरही व्हावी आणि ती सर्वांसाठी समान असावी. क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा असेल तर पोलीस तिथपर्यंत पोहोचू शकतात, असा संदेश या कारवाईतून गेला आहे.
📲Get App