🔥 ट्रेंडिंग લાઠીમાં ૧૬૦ વર્ષ જૂની પરંપરા: નવરાત્રિ... असम ने केंद्र को भेजा बाढ़ क्षति डेटा,... असम के नागाon में शहद‑जाल और ब्लैकमेल... देनिश व सिब्संकर की शतक, असम ने पंजाब... झारखंड स्वास्थ्य विभाग ने रैंक्स के आर... झारखंड से दक्षिण-पश्चिम मानसून हट गया,...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोठी संधी! दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी १६ नोव्हेंबरलाच होणार प्रसिद्ध
.
सरकारी योजना

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोठी संधी! दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी १६ नोव्हेंबरलाच होणार प्रसिद्ध .

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 13 अक्टू. 2026, 12:32 AM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोठी संधी! दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी १६ नोव्हेंबरलाच होणार प्रसिद्ध
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
ठाणे/मुरबाड:दिनांक १३/१०/२०२६.
(विशेष वृत्त )
ठाणे जिल्हा व मुरबाड तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे व दुरुस्ती करण्यासाठी ही मोठी संधी चालून आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्यात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती सादर करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली होती. मात्र, जास्तीत जास्त पात्र नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी आता निवडणूक आयोगाने ही मुदत वाढवून २६ ऑक्टोबर २०२६ केली आहे.
सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
• दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६
• नोटीस टप्पा आणि दावे-हरकती निकाली काढण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६
• अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख: १६ नोव्हेंबर २०२६
निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असली, तरी पूर्वघोषित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबर २०२६ रोजीच प्रसिद्ध केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले आणि मुरबाडचे तालुका रिपोर्टर किशोर पवार यांनी स्थानिक प्रशासकीय पातळीवर घेतलेल्या आढाव्यानुसार, या मुदतवाढीमुळे मुरबाड तालुका व संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो तरुण आणि नवीन मतदारांना आपले नाव नोंदवण्याची तसेच नावातील चुका दुरुस्त करण्याची हक्काची वेळ मिळाली आहे.
पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले दावे व हरकती विहित वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले.
निवडणूक आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
📲Get App