🔥 TRENDING ਹੁਸ਼ਿਆਰਪੁਰ ਵਿੱਚ ਅੱਜ ਤੀਬਰ ਬਾਰਿਸ਼ સાબરકાંઠા, ઈડરમાં મહારાણા પ્રતાપ સર્કલ... બોટાદમાં જિલ્લા શિક્ષણ કચેરીના એડીઆઈને... વલસાડમાં કલેક્ટર નીતિન સાંગવાન પર પત્ર... Madras High Court Rejects M.K. Stalin'... Chief Minister Vijay Announces New Sec...
03 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

मुरबाड तालुक्यात NCMC वरून महिलांचा गोंधळ, अखेर आर्धा तिकीट देण्याच्या सूचना

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 03 Sep 2026, 07:06 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
Need 24 न्युज , जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले. मुरबाड :दिनांक 3/09/2026 ST बसेसमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात आली होती. परंतु, सक्तीनंतर दोनच दिवसांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड योजनेचा फज्जा उडाला. सर्व्हर डाऊनमुळे अनेकांना सवलतीच्या दरात तिकीट न मिळाल्याने पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. यात काही प्रवाशांनी हुज्जतबाजी केल्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहकांना मनस्ताप झाला. अखेर बुधवारी सायंकाळी एसटीच्या मुंबई येथील कार्यालयातून कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांना पावती दाखवून ३० सप्टेंबरपर्यत, तर सर्व्हर डाऊन असल्यास कार्डधारकांना १४ सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकीट देण्याचा आदेश देण्यात आला.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसेसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी मंगळवार, १ सप्टेंबरपासून प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळविण्यासाठी हे कार्ड दाखविणे बंधनकारक केले होते. परंतु, पहिल्याच दिवशी एनसीएमसी कार्ड योजनेचा फज्जा उडाला. अनेक प्रवाशांनी हे कार्ड दाखवून सवलतीचे तिकीट मागितले. परंतु, त्यांच्या कार्डमध्ये बॅलन्स नसल्यामुळे वाहकांना तिकीट देता आले नाही. सर्व्हर डाऊन असल्यामुळे वाहकांना प्रवाशांचे कार्ड रिचार्जही करता आले नाही व त्यांना सवलतीचे तिकीटही देता आले नाही. या प्रकारामुळे अनेक प्रवाशांनी कार्ड असून सवलतीचे तिकीट मिळत नसल्याने बसमधील वाहकांसोबत वाद घातल्याच्या घटनाही घडल्या.

वाहकाकडे असलेल्या मशीनमधून केवळ पूर्ण तिकीट, १२ वर्षांखालील मुलांचे तिकीट आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांचे २ रुपये भरून काढण्यात येणारे तिकीटच निघत होते. बुधवारी सायंकाळपर्यंतही हा गोंधळ तसाच सुरू होता. त्यामुळे प्रवासी आणि एसटीच्या वाहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


असा निघाला तोडगा

एसटीच्या वाहकांकडे असलेल्या मशीनमध्ये एनसीएमसी कार्ड वापरल्यानंतर सर्व्हर डाऊन असल्यामुळे मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांत सवलतीचे तिकीट देता आले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक महाव्यवस्थापकांनी बुधवारी सायंकाळी महाराष्ट्रातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र देऊन एनसीएमसी कार्ड असलेल्या प्रवाशांना १४ सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकीट देण्याचे आदेश दिले. तर ज्यांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली, परंतु त्यांना कार्ड मिळाले नाही, अशा प्रवाशांना नोंदणी केल्याची पावती दाखविल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकीट देण्याच्या सूचना केल्या आहेत.


'एसटी महामंडळ प्रशासनाने यंत्रणा सज्ज नसताना एनसीएमसी कार्ड सुरू करण्याची घाई केली. यामुळे वाहकांना कर्तव्य बजावताना अडचणी येऊन त्यांचा प्रवाशांसोबत वाद होत आहे. यावर एसटी महामंडळाच्या प्रशासनाने त्वरित तोडगा काढून वाहक व प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल
📲Get App