🔥 ट्रेंडिंग लुधियाना में भाजपा पार्षद और भाई पर मा... बड़े आयोजनों से पहले नई दिल्ली रेलवे स... इंदौर रिंग रोड पर हजारों गाड़ियां फँसी... इंदौर के व्यापारी को 10 करोड़ की फिरौत... निर्माणाधीन साइबर थाने का अपर पुलिस अध... राष्ट्रीय प्रेस दिवस 16 नवंबर की हार्द...
16 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धर्म

मुरबाड तालुक्याचा ४९ वा 'श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा २०२६' येत्या २३ नोव्हेंबरपासून प्रारंभ; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन..

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 16 नव. 2026, 06:24 PM 👁 25
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
मुरबाड विशेष वार्तापत्र

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे. सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक: १६/११/२०२६.
मुरबाड तालुक्याचा ४९ वा 'श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा २०२६' येत्या २३ नोव्हेंबरपासून प्रारंभ; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन
मुरबाड (प्रतिनिधी):
अखिल मुरबाड तालुका पारमार्थिक शेतकरी समाज, मुरबाड (जि. ठाणे) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ४९ व्या 'श्रीक्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा - २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विश्व माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी निघणाऱ्या या भक्तिमय पायी दिंडी सोहळ्यात तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वानंद सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिंडी सोहळ्याचे वेळापत्रक:
• प्रारंभ: सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ (कार्तिक शु. १४)
• सांगता: रविवार, दिनांक ०६ डिसेंबर २०२६ (कार्तिक व. १३)
संत परंपरा व मार्गदर्शन:
हा ऐतिहासिक पायी दिंडी सोहळा वै.ह.भ.प. गुरुवर्य विठ्ठल बाबा सरजिने यांच्या प्रेरणेने, वै.ह.भ.प. जगन्नाथ महाराज पवार (गुरुजी) यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. दत्तात्रय महाराज सरजिने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाविक जनतेच्या सहकार्याने पार पडणार आहे.
आयोजन समिती व पदाधिकारी:
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल मुरबाड तालुका पारमार्थिक शेतकरी समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी विशेष परिश्रम घेत आहेत. यामध्ये अध्यक्ष ह.भ.प. गोटीराम काळूराम घोरड, उपाध्यक्ष ह.भ.प. अरुण बबन कुर्ले, चिटणीस ह.भ.प. दिलीप जगन्नाथ पवार व ह.भ.प. हरिश्चंद्र उमाकांत जाधव, खजिनदार ह.भ.प. रामचंद्र महादू सासे तसेच सर्व कार्यकारिणी व आजीव सभासद यांचा समावेश आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या "श्री गुरुसारिखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।" या अभंगवाणीच्या साक्षीने निघणाऱ्या या ४९ व्या दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी मुरबाड तालुक्यात सुरू झाली आहे.
📲Get App