🔥 TRENDING वारिसलीगंज में बिजली पोल पर शॉर्ट सर्क... બોલિવૂડ અભિનેતા નાની પાટેકરનું નિધન: 7... आंवला तहसील में तेज़ ओले ने किसानों की... મહાન અભિનેતા નાના પાટેકરનું 75 વર્ષની... TVK Condemns Rahul Gandhi's Arrest, Ca... ભારતીય જનતા પાર્ટીનું માલધારી મહા સંમે...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त; पाठलाग करून बोलेरो पकडला, यूपीच्या तरुणाला बेड्या

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त; पाठलाग करून बोलेरो पकडला, यूपीच्या तरुणाला बेड्या

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 08 Oct 2026, 06:44 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

मुक्ताईनगर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोदवड चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी तब्बल १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका २५ वर्षीय चालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी बोदवड चौफुली मार्गे प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी विशेष पथक तयार केले.

पथक परिसरात वाहनांची तपासणी करत असताना HR-84-1073 क्रमांकाचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदरित्या जाताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून बोदवड चौफुलीजवळ वाहनाला घेरले. झडती घेतली असता वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला साठा आढळून आला.

कारवाईत पोलिसांनी प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाल्याची ६ हजार ७५० पाकिटे (किंमत १० लाख १२ हजार ५०० रुपये) आणि प्रिमियम झेड एन-०१ जाफरानी जर्द्याची ६ हजार पाकिटे (किंमत ५ लाख ७६ हजार रुपये) जप्त केली. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे बोलेरो वाहनही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी शुभमसिंग विद्ययाराम (वय २५, रा. निनावा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेला माल कुठून आणला? या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक आडसूळ यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, अंमलदार रविंद्र धनगर, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली असून, कुठेही गुटखा, पानमसाला विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
📲Get App