🔥 TRENDING NEED24news मथुरा में संस्कृति विवि में गूंजा 'न र... West Bengal and Assam collaborate to r... Jharkhand Ministers and Party Workers... સાવધાન મેડિકલ સ્ટોર અને વેપારી મિત્રો... दिल्ली में रिकॉर्डतोड़ बारिश से बदला म...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात एकाच रात्रीत चार दुकाने फोडली ३ चोरटे CCTV कॅमेरा केंद

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 30 Oct 2026, 10:29 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समधील चार दुकाने फोडली; १ लाख ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास!

लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समधील चार दुकाने फोडली; १ लाख ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास!

पहाटे तीनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांची चोरी; सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद, व्यापारी वर्गात खळबळ

लोणावळा | प्रतिनिधी!

लोणावळा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, लोणावळा - भांगरवाडी रस्त्यावरील इंद्रायणी नगर परिसरातील गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्स मधील एकाच रात्री चार दुकाने फोडून चोरट्यांनी तब्बल १ लाख ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्स मधील सत्यम फॅशन शूज, क्रेझ बुटीक, चैतन्य चाट आणि पार्टी बलून हब, या दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर अर्धवट उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील रोख रक्कम तसेच साहित्य चोरून नेले. यावेळी मी अँड मॉम या दुकानाच्या शटरचे ही नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या चोरी मध्ये सत्यम फॅशन शूज दुकानातील ६० हजार रुपये रोख व ७ हजार ५०० रुपयांचे साहित्य, क्रेझ बुटीक मधील घड्याळे, शर्ट, टी-शर्ट, पॅन्ट व जॅकेट असा एकूण ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, तर पार्टी बलून हब, दुकानातील २५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, दुकानांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आणि डोक्यात टोपी घालून चोरी करताना दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. चोरी केल्यानंतर अंधाराचा फायदा घेत हे चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेप्रकरणी सत्यम फॅशन शूजचे मालक स्निल शिंदे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एकाच रात्री चार दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(अ), ३३९(क) व ३(५) अंतर्गत तीन अनोळखी व्यक्तीं विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन कदम करीत आहेत.

एकाच रात्री चार दुकानांचे शटर उचकटून चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी व्यापारी संकुलां मध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासह पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान आता लोणावळा शहर पोलिसांसमोर आहे.
📲Get App