🔥 TRENDING मेरठ नीला ड्रम हत्याकांड: पत्नी मुस्का... सासनी में सरकारी चावल की कालाबाजारी का... हाथरस: युवक के लापता होने से परिजन परे... Income Tax Seizes ₹3.6 million Silver... Madhya Pradesh to Directly Recruit 100... Two Men Detained at Indore Airport Whi...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
लोककलावंत शोभाताई लाखे आणि पापाभाई जमादार यांची 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'ला सदिच्छा भेट
Entertainment

लोककलावंत शोभाताई लाखे आणि पापाभाई जमादार यांची 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'ला सदिच्छा भेट

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 14 Oct 2026, 09:12 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नूतन कला केंद्रा'च्या संचालिका तथा ज्येष्ठ लोककलावंत श्रीमती शोभाताई लाखे आणि लोककलावंत व सिने-अभिनेते पापाभाई जमादार बोरगावकर यांनी 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन' हाऊसला सदिच्छा

लोककलावंत शोभाताई लाखे आणि पापाभाई जमादार यांची 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'ला सदिच्छा भेट

पुणे जिल्हा प्रतिनिधी:
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगली येथील 'नूतन कला केंद्रा'च्या संचालिका तथा ज्येष्ठ लोककलावंत श्रीमती शोभाताई लाखे आणि लोककलावंत व सिने-अभिनेते पापाभाई जमादार बोरगावकर यांनी 'तृप्ती फिल्म
प्रोडक्शन' हाऊसला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत महादेव लाखे, मुकुंद रासकर आणि अशोक जावळे हे मान्यवर उपस्थित होते. तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत सर यांनी सर्व अतिथींचे स्वागत करून त्यांचा योग्य तो सन्मान केला.
'घुंगरू' लघुपटाच्या आठवणींना दिला उजाळा
या भेटीदरम्यान नूतन कला केंद्राच्या संचालिका शोभाताई लाखे यांनी यापूर्वी तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित 'घुंगरू' या लघुपटाच्या शूटिंगसाठी शिरूर येथे आल्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
तसेच 'घुंगरू' लघुपटात प्रमुख भूमिका साकारणारे लोककलावंत व सिने-अभिनेते पापाभाई जमादार बोरगावकर यांनी सांगितले की, "या चित्रपटातील अभिनयामुळे मला चित्रपटसृष्टीत एक नवीन ओळख मिळाली असून, पुढे अनेक नवीन चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सांगली जिल्ह्यातूनही कलाकार म्हणून मला आता मोठा वाव मिळतोय, याचे सर्व श्रेय तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत सर यांनाच जाते."
मण्यार निर्वीकर कुटुंबीयांकडून स्नेहभोजन व सत्कार
या दौऱ्यादरम्यान पापाभाई बोरगावकर व शोभाताई लाखे यांनी शिरूर तालुक्यातील निर्वी येथील 'ताशा सम्राट' शिरजभाई मण्यार निर्वीकर व शकील मण्यार निर्वीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

मण्यार कुटुंबीयांच्या आग्रहास्तव त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या वेळी मण्यार परिवाराच्या वतीने सर्व कलाप्रेमी व अतिथींचा विशेष सन्मान करण्यात आला.
निर्माते रामदासजी राऊत यांच्या कार्याचे कौतुक
तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत हे नेहमीच कलाकारांसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात.

कलाकारांप्रति असणारे त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा शिरूर येथे आल्यानंतर प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो, अशा शब्दांत शोभाताई लाखे व पापाभाई बोरगावकर यांनी कौतुक केले. "आजच्या समाजात अशी माणसे फार दुर्मिळ आहेत," असे उद्गार काढत सर्व उपस्थित अतिथींनी 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'च्या पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या.
📲Get App