🔥 TRENDING Nani’s ‘The Paradise’ Continues to Ris... Stallone Calls for Streaming Platforms... India's Centre to Centralise Sterile D... Thrive Pain Clinic Launches New Wellne... Odisha Boosts Anganwadi Staff Allowanc... India's Centre Approves Sale of Surplu...
26 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

लांजा तालुक्यात पावसाअभावी भात पिकांचे नुकसान; कृषी विभागाची पाहणी

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 26 Sep 2026, 03:42 PM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लांजा तालुक्यातील बेनी खुर्द आणि वाडगाव परिसरात पावसाच्या कमतरतेमुळे भात पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला आहे. कृषी विभागाने शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

लांजा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने बेनी खुर्द आणि वाडगाव परिसरातील भात पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहेत. २६ सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या पथकाने या भागातील शेतीची पाहणी केली असता, पिकांच्या विविध अवस्थांमध्ये पावसाअभावी अडचणी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

हळव्या भाताची पिके सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून, कमी पावसामुळे काही शेतांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. निमगरवा भात फुलोऱ्यात आहे, मात्र पावसाची कमतरता असल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उंचावरील शेतांमध्ये भात पिकांची वाढही थांबल्याचे आढळले.

गरवा भात फुलोऱ्यापूर्वीच्या अवस्थेत असून, पावसाअभावी त्याच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पिके शेंड्याकडून करपल्यासारखी दिसत असून, भात पिवळसर पडल्याचेही आढळून आले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकऱ्यांसाठी एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २८ महिला शेतकऱ्यांचे शेतकरी प्रमाणपत्र काढण्यात आले. तसेच, महाविस्तार एआय अॅपचा अधिकाधिक वापर करण्यासोबतच, PMFME योजनेतून शेतीमाल प्रक्रिया युनिट सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण रत्नपारखी, सचिन भिंगारे, केदार मदने, विनायक पाटील आणि मंडळ कृषी अधिकारी अनिल मोरे उपस्थित होते.
📲Get App