🔥 TRENDING मथुरा: युवक ने ग्राम प्रधान से पूछा सव... India Vs West Indies Jharkhand Announces NEET PG 2026 Round... Williams Trading Downgrades BIRK Stock... Tennessee Driver Turns $3,200 School B... ED serves summons at Kerala Chief Mini...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कल्याण-लातूर महामार्गासाठी मुरबाड तालुक्यातील २२ गावांमधील २७२ शेतकऱ्यांची जमीन बाधित; ३५ हजार कोटींचा प्रकल्प
Lifestyle

कल्याण-लातूर महामार्गासाठी मुरबाड तालुक्यातील २२ गावांमधील २७२ शेतकऱ्यांची जमीन बाधित; ३५ हजार कोटींचा प्रकल्प

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 17 Oct 2026, 01:23 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कल्याण-लातूर महामार्गासाठी मुरबाड तालुक्यातील २२ गावांमधील २७२ शेतकऱ्यांची जमीन बाधित; ३५ हजार कोटींचा प्रकल्प
जिल्हारिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १७/१०/२०२६.
मुरबाड:ठाणे विशेष वृत्त कल्याण
कल्याण ते लातूर दरम्यानचा १२ तासांचा प्रवास अवघ्या ५ तासांवर आणण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’च्या (MSRDC) माध्यमातून 'कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग' प्रकल्प प्रस्तावित केला आहे. सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या ४४२ किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील २२ गावांमधील २७२ शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे.
या २२ गावांमध्ये प्रामुख्याने कावकोली, तोडली, सासणे, न्हावे, राव पाडा, केडुली, शेलारी, खंदारे, कोरावळे, कान्हेर्ले, माझगाव, तळवली, खेडले, पानेह, कांदळी, पिंपळघर, धसई, शिरपूर, चाफा, एकतहरे, पेंढारी आणि या गावांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गावांमधील शेतकऱ्यांची तब्बल ४० ते १०० टक्के जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील माझगाव आणि खंदारे या दोन गावांतील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याचे समोर आले आहे.
६ जिल्ह्यांमधून जाणार महामार्ग, माळशेज घाटात ८ किमीचा बोगदा
हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर अशा एकूण सहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. कल्याण, मुरबाड, माळशेज घाट, ओतूर, आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, आंबेजोगाई आणि लातूर अशा मुख्य भागांना जोडणारा हा रस्ता असणार आहे. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान माळशेज घाटात ८ किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जाणार आहे. या महामार्गाचे सर्वेक्षण जवळपास १० वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असून आता या २२ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी निश्चित करण्यात आल्या आहेत.
योग्य मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
या महामार्ग प्रकल्पामुळे माझगाव आणि खंदारे गावातील अनेक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत. "महामार्गाचे सर्वेक्षण झाले असून जमिनी निश्चित झाल्या आहेत, मात्र शासनाने शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य आणि न्याय्य मोबदला दिला पाहिजे," अशी आग्रही मागणी स्थानिक बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
📲Get App