🔥 TRENDING ୯ କୋଟିରୁ ଅଧିକ ସରକାରୀ ଅର୍ଥ ଆତ୍ମସାତ୍; ଆଉ... হাবড়া হাসপাতালে সামনে 'ভোলে বাবা'র মু... ଯାଜପୁରରୁ ଭାସିଲେ, ପଟ୍ଟାମୁଣ୍ଡାଇରୁ ଉଦ୍ଧାର... నోషనల్ ఇంక్రిమెంట్లు ఇవ్వలేం: మంత్రి డ... લવાલ ગામમાં સોશિયલ મીડિયા પર વીડિયો મુ... ଘାସ ମରା ବିଷ ଦେଇ ନବବଧୂକୁ ମାରିଦେଲେ !
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

कळंबोली मधील राजे मित्र मंडळाची १५ वर्षांची पर्यावरणपूरक परंपरा;कृत्रिम हौदात ‘श्रीमंत’ गणपतीचे विसर्जन*

✍️ Reporter: Shrinath Damatray Lad 🗓 28 Sep 2026, 12:30 PM 👁 11
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद;

*कळंबोली मधील राजे मित्र मंडळाची १५ वर्षांची पर्यावरणपूरक परंपरा;कृत्रिम हौदात ‘श्रीमंत’ गणपतीचे विसर्जन*
रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद;

कळंबोली|प्रतिनिधी| श्रीनाथ(गणेश) दत्तात्रेय लाड|: गणेशोत्सव म्हटले की जलप्रदूषण आणि निर्माल्याच्या प्रश्नांबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही समोर येते. याच सामाजिक भानातून राजे मित्र मंडळ, एलआयजी, 1st J कंपाउंड, सेक्टर-३, कळंबोली यांनी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची आपली १५ वर्षांची परंपरा कायम ठेवली. मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेला एलआयजीचा ‘श्रीमंत’ गणपती उत्सव-२०२६ भक्तिमय तसेच सामाजिक उपक्रमांनी उत्साहात पार पडला.

मंडळाने यंदा मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आगळावेगळा उपक्रम राबविला. कंपाउंडमधील मैदानावरच कृत्रिम हौदाची निर्मिती करून भावपूर्ण वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, विसर्जनानंतर गणेशमूर्तीची माती वाया न घालवता ती परिसरातील झाडांना देण्यात आली. ‘बाप्पाचे विसर्जन आणि निसर्गाचे संवर्धन’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

*रक्तदानातून सामाजिक बांधिलकी*
गणेशोत्सवाचे औचित्य साधत मंडळाच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर रोजी MGM हॉस्पिटल, कामोठे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रमाणपत्र देऊन मंडळाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले.

गेल्या १५ वर्षांपासून भक्तीबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणाऱ्या राजे मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांचा सहभाग यांचा सुंदर मेळ घालण्याचा प्रयत्न मंडळाने यंदाही यशस्वी केला.
📲Get App