🔥 TRENDING સુરતના બારડોલીમાં સરપંચ અનામત રોટેશનમા... Fit India’s ‘Sundays on Cycle’ celebra... સુરત ₹19 લાખના કથિત તોડકાંડનો વિવાદ વક... Assam, Haryana and Gujarat weigh listi... ਤਰਨ ਤਾਰਨ ਪੁਲਿਸ – ਅਮਨ-ਕਾਨੂੰਨ ਦੀ ਰਾਖੀ ਲਈ... Gujarat Tea Association Announces New...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

कुडवली येथील स्टारशाईन कंपनीवर सीटू (CITU) युनियनचे ‘टाळे ठोक आंदोलन’; १३० कामगारांना कामावर घेण्याची मागणी.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 28 Nov 2026, 11:10 PM 👁 28
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक: २९/११/२०२६
ठाणे मुरबाड: (प्रतिनिधी):कामगार विशेष वार्ता पत्र.
कुडवली (ता. मुरबाड) येथील 'मे. स्टारशाईन मॅनिफॅक्चीरिंग प्रा. लि.' कंपनी प्रशासनाने १३० कामगारांना कामावरून बाहेर ठेवल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना (सीटू संलग्न) यांच्या वतीने कंपनीवर तीव्र 'टाळे ठोक आंदोलन' करण्यात आले. शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मोठ्या संख्येने कामगार आणि युनियन पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या गेटसमोर एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कंपनी व्यवस्थापनाकडून कामगार कायद्यांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला. आंदोलनादरम्यान युनियनने प्रशासनासमोर आपल्या पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
१. कामगारांची पुनर्स्थापना: बाहेर ठेवलेल्या सर्व १३० कामगारांना तात्काळ पूर्ववत कामावर घेण्यात यावे.
२. दिवाळी बोनस: सर्व कामगारांना कामगार कायद्यानुसार हक्काचा दिवाळी बोनस देण्यात यावा.
३. किमान वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी: सर्व कामगारांना किमान वेतनानुसार पगार देऊन त्यांना सेवेत कायम करण्यात यावे.
४. मालकांवर कारवाई: कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपनी मालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
५. युनियनसोबत चर्चा: कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या पसंतीच्या युनियनसोबत तात्काळ बोलणी सुरू करावी.
पोलीस यंत्रणेची सलोख्याची भूमिका आणि मोलाचे सहकार्य:
या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने कंपनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस यंत्रणेने अत्यंत संयमी आणि सलोख्याची भूमिका घेत दोन्ही बाजूंमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रक्रियेत मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन हुंदळेकर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या योग्य समन्वयामुळे तणावपूर्ण परिस्थिती शांततेत हाताळली गेली.
दरम्यान, कामगारांच्या या रास्त मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास यापुढेही आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
📲Get App