स्थानीय
गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरीतून २ हजार ५०७ जादा बसेस सोडणार एसटी महामंडळ
यहाँ देखें:
▶️ YouTube
गौरी-गणपती विसर्जनानंतर कोकणातून मुंबई आणि इतर शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने रत्नागिरी विभागातून एकूण २ हजार ५०७ विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबई आणि इतर शहरांकडे परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून एकूण २ हजार ५०७ विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
शनिवारी २३७ तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी तब्बल १ हजार ६६१ बस गाड्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय सोमवार, २१ सप्टेंबर रोजी ४५७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंतच्या पुढील दिवसांमध्येही टप्प्याटप्प्याने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात २२ सप्टेंबरला ५१, २३ सप्टेंबरला १९, २४ सप्टेंबरला १९, २५ सप्टेंबरला २२, २६ सप्टेंबरला २० आणि २७ सप्टेंबरला २१ बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी गावी येताना जशी एसटीच्या जादा गाड्या आणि ग्रुप बुकिंगचा लाभ घेतला होता, त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठीही रेल्वेसोबतच एसटीच्या या विशेष नियोजनाचा मोठा आधार मिळणार आहे. कोकण रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग आधीच फुल्ल झाले असून, काही खासगी ट्रॅव्हल्स देखील कोकणात वळवण्यात आल्या आहेत.