🔥 TRENDING सीतापुर में गणेश चतुर्थी महोत्सव का भव... રાજકોટ પોલીસમાં જુગાર ધરપકડ બાદ 'સેટલમ... श्री चांरगबाबा मित्र मंडळ दुरगुडे पट न... यूपी में स्टार्टअप्स को मिल रहा बढ़ावा... Team India star Rinku Singh to marry C... मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने मथुरा की...
16 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

गुहागर तालुकीतील पालशेत-जोईलवाडीमध्ये ऐन गणेशोत्सवात पाणीटंचाईने ग्रासलेले ग्रामस्थ

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 16 Sep 2026, 09:30 AM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गुहागर तालुकीतील पालशेत-निवोशी ग्रामपंचायतीच्या जोईलवाडीमध्ये आठ दिवसांपासून नळपाणीपुरवठा बंद असून, ऐन गणेशोत्सवाच्या काळात महिला वर्गाने हंडा डोक्यावर घेऊन पाणी आणण्यासाठी पायी चालावे लागले.

गुहागर तालुकीतील पालशेत-निवोशी ग्रामपंचायतीच्या जोईलवाडीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून नळपाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने सणाच्या आनंदावर पाणीटंचाईचे सावट आले असून, मुंबई‑पुण्यासह विविध शहरांतून गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

महिलांना दूरवर पायी जाऊन हंडे, बादल्या डोक्यावर घेऊन पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात पाण्यासाठी होणारी ही पायपीट ग्रामस्थांच्या संतापात भर घालत आहे.

या समस्येबाबत जोईलवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) पालशेत‑निवोशी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले. बंद असलेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच तोपर्यंत ग्रामस्थांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा बंद असतानाही ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. याच वर्षापासून पाणीपट्टीत वाढ झाली असून नागरिकांकडून वाढीव पाणीपट्टीची वसुली केली जात असताना ऐन सणासुदीच्या काळात मूलभूत गरज असलेला पाणीपुरवठाच सुरळीत होत नसेल, तर वाढीव पाणीपट्टी कशासाठी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
📲Get App