🔥 ट्रेंडिंग விருதுநகர் மாவட்டம் திருச்சுழி அருகே ப... पीएलआई सेवा 15 से 25 नवंबर तक रहेगी बं... ಮಾದಕ ವಸ್ತುಗಳ ಹಾವಳಿ ತಡೆಗಟ್ಟಲು ಕಠಿಣ ಕ್ರಮ... चुनाव के लिए जनप्रतिनिधियो ं ने किया द... बड़कागांव में गौ तस्करी के आरोप में बड... चार दिवसीय छठ महापर्व आज से शुरू 15 को...
13 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजनीति

एक आमदार काय करू शकतो? याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरीश पटेल!

✍️ रिपोर्टर: Suhas Tagare 🗓 13 नव. 2026, 07:05 PM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

एक आमदार काय करू शकतो? याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरीश पटेल!

एक आमदार काय करू शकतो? याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरीश पटेल!

अमरीश पटेल १९९०-२००९ काळात काँग्रेसकडून ४ वेळा आमदार होते. ते महाराष्ट्राचे शिक्षणमंत्रीही होते. २०१९ वेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला.आता गेली ४ टर्म ते विधानपरिषद आमदार आहेत कारण त्यांचा मतदारसंघ आदिवासी प्रवर्गासाठी राखीव झाला. अमरीश पटेल यांच्या मतदारसंघात गुजराती पटेल लोकांचं एकच घर असूनही पटेल अभूतपूर्व मताधिक्याने निवडून येतात. त्याचं कारण जलसंधारण आणि शिक्षणक्षेत्रातील कामामुळे!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचे आमदार अमरीश पटेल यांनी शिरपूर पॅटर्न नावाचा लहान लहान बंधारे बनवून पूर्ण तालुका जलमय केला.या आमदारांनी शेतकऱ्यांकडून १ रुपया न घेता जवळपास ४७५ बंधारे बनवले आहेत आणि १२-१५ बंधाऱ्याचे काम चालूच आहे.प्रत्येक बंधाऱ्यात हा ५०० मीटर लांब आणि २० मीटर रुंदीचे माती काढण्याचे काम करून त्यात नद्यांचे किंवा पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवले जाते.

नद्यांवर बंधारे बनवण्याचे जेही सरकारी टेंडर निघतात त्यांची कामे १०-१५ टक्क्यांनी कमीने घेऊन अमरीश पटेल त्यांच्याकडेच असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेतात. त्यांचं काम हे टॉप क्लास असतं. सरकारच्या पैशातूनच हि कामे त्यांनी केली आहेत पण त्यांनी सरकारी पैशांचा वापर पुरेपूर केला आहे.

शिरपूरमधील शेतकरी एका वर्षात तीन पिके घेतात.या बंधाऱ्यामुळे आजही दुष्काळात सगळ्या विहिरी पाणीदार आहेत.तिथे फळबागा हिरव्यागार आहेत. शिरपूर शहराला दररोज ५ तास पाणीपुरवठा केला जातो.प्रत्येक घरात वॉटर मीटर बसवलेले आहे.

शिरपूर हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या आदिवासीबहुल तालुक्यात ५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न ७-८ लाखांच्या घरात आहे. दरवर्षी १५ आदिवासी मुलांना अमरीश पटेल डॉक्टर बनवतात. आजपर्यंत त्यातून ८० आदिवासी मुले डॉक्टर झालीत. त्यांनी आपल्या मतदारसंघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारलेले आहे.

अमरीश पटेल आपले स्वतःचे काही पैसे, त्यानंतर SVKM कडून ४-५ कोटी CSR फंड आणि त्यांच्या मुलीकडून ४-५ कोटी घेऊन हि बंधाऱ्यांची कामे करतात.ते स्वतः SVKM शिक्षण विषयात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत

अमरीश पटेल यांच्या मते शेतकरी स्वतः या पॅटर्नमध्ये सहभागी होत नाहीत.त्यासाठी शेतकरी प्रोक्लेन आणि ट्रॅक्टरच्या वापरासाठी आग्रही असतात.लोकसहभागाच्या चळवळी जलसंधारणात टिकाऊ काम आजपर्यंत का करू शकल्या नाहीत याची हि स्पष्टोक्ती आहे.

महाराष्ट्र सरकारने याच आधारावर जलयुक्त शिवार योजना आणली पण या योजनेचा अप्रोच गुत्तेदार केंद्रित असल्याने ती योजना आताच्या महाराष्ट्राच्या दुष्काळात कामाला आलेली नाही.कारण या दुष्काळात अजून तरी जलयुक्त शिवार योजनेतून पाणीदार झालेल्या गावांच्या केस स्टडीज बाहेर आल्या नाहीत. अधिकाऱ्यांच्या टक्केवारी खाण्यामुळेही आणि २०१४ नंतर चांगला पाऊस पडल्याने हि योजना संपुष्टात आली.

या जलयुक्त शिवारच्या कामाचे जेही फोटो येतात ते पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतरचे येतात पण उन्हाळ्यात यातले किती पाणी टिकते किंवा त्या भागातील विहिरींना, बोअरवेल्सला किती पाणी असते?

मराठवाड्यातील इथूनमागच्या आमदारांनी आणि किमान मंत्री झालेल्या नेत्यांनी जरी त्यांचे तालुके जलमय केले असते तर दुष्काळाची अशी भीषणता हिवाळ्यातच अनुभवता आली नसती!
📲Get App