Education
बालाजीच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर ठेवला सामाजिक बांधिलकीचा आगळावेगळा आदर्श
सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील बालकांची दिवाळी केली गोड; किराणा साहित्याचे केले प्रेमपूर्वक वाटप
बालाजीच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर ठेवला सामाजिक बांधिलकीचा आगळावेगळा आदर्श!
सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील बालकांची दिवाळी केली गोड; किराणा साहित्याचे केले प्रेमपूर्वक वाटप
शिरूर : 4 नोव्हेंबर 2026 : सण-उत्सव केवळ स्वतःच्या आनंदासाठी नसतात, तर आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण असते. याच विचाराला कृतीची जोड देत बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सेमी इंग्लिश, शिरूर येथील विद्यार्थ्यांनी समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
विद्यालयाच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून द ग्लोबल मदर फाउंडेशनच्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलांची दिवाळी आनंददायी व गोड व्हावी, या उदात्त हेतूने जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून त्या आश्रमाला भेट देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत किराणा साहित्य, विविध प्रकारची धान्ये, गोडेतेल, विविध डाळी, शेंगदाणे, साबण, सुगंधी तेल, उटणे, साखर, पोहे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. विशेष म्हणजे, या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. सदाशिव पवार साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संतोष येवले सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देत मोठ्या प्रमाणावर साहित्य जमा केले. स्वतःच्या दिवाळीच्या आनंदासोबतच आश्रमातील मुलांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांनाही दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा, हीच या उपक्रमामागील मुख्य भावना होती.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, सहकार्य, दातृत्व, संवेदनशीलता आणि माणुसकीची मूल्ये रुजवण्याचा विद्यालयाचा प्रयत्न अधोरेखित झाला. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नसून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे, हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संतोष येवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका सौ. स्वाती चत्तर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ललिता पोंधे यांनी केले.
आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेणे, हीच खऱ्या दिवाळीची ओळख!' या सुंदर विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या बालाजी विद्यालयाच्या या उपक्रमाचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी समाजाला दिलेला हा माणुसकीचा संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.