खेल
भोरमधील पहिली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा रेटिंग प्राप्त बुद्धिबळपटू म्हणून तेजश्री विशाल सपकाळ हिने नाव नोंदविले
पुणे येथील कात्रज येथे दिनांक १७ व १८ ऑक्टोबर रोजी आयोजित शिवभूमी इंटरनॅशनल ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेत भोर शहरातील तेजश्री विशाल सपकाळ हिने १६ वर्षांखालील वयोगटात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले होते, या उल्लेखनिय कामगिरीच्या जोरावर १ नोव्हेंबर रोजी FIDE ची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली त्या मध्ये तेजश्रीला १४४७ रॅपिड रेटिंग प्राप्त झाले.भोर शहरातील पहिली आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला आहे.
तेजश्रीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल भोर मधील क्रीडाप्रेमीनकडून कौतुक होत आहे आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
तेजश्रीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल भोर मधील क्रीडाप्रेमीनकडून कौतुक होत आहे आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.