🔥 TRENDING भीरा-पलिया नेशनल हाईवे पर ट्रक-बाइक की... ਪਰਿਵਾਰ ਵਿਛੋੜਾ ਪਬਲਿਕ ਸਕੂਲ ਸਰਸਾ ਨੰਗਲ ਵਿਖ... ਪਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਝੋਟੇ ਦੇ ਕਤਲ ਵਿਰੁੱਧ ਕਿਸਾਨ-... मेराल में जय भवानी संघ पूजा पंडाल का उ... નર્મદા જિલ્લામાં સુરવા હેલિપેડ ખાતે મુ... एटा: धोखाधड़ी मामले में वांछित अभियुक्...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अवकाळी पावसाच्या तडाखा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 17 Oct 2026, 04:30 PM 👁 26
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या तडाखा

नंदुरबार - सातपुड्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; झाडं कोसळली, बळीराजा हवालदिल*

*नंदुरबार, प्रतिनिधी -* नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. चांदसैली, रामपूर, तलावडी आणि म्हसावद परिसराला या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
📲Get App