🔥 TRENDING સાબરકાંઠા: વિજયનગર, ચિઠોડા અને ખેરોજમા... बीबी राजिंदर कौर की दानशीलता से बनी मस... नोनिया महासंघ के सम्मेलन में समाज के अ... ખાવડા-ભુજ હાઈવે પર ગોઝારો અકસ્માતમાં આ... भोंगवली सबस्टेशन प्रकल्पावरून संग्राम... ધારી-ચલાલા સ્ટેટ હાઈવે પર બાઈક સ્લીપથી...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

अंधश्रद्धेच्या काळोखावर विवेकाचा प्रहार! मुरबाडमध्ये 'फलज्योतिष्य आणि भोंदूगिरी विरोधी' परिषदेत प्रबोधनाची मशाल.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 22 Nov 2026, 04:38 PM 👁 26
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
किशोर पवार मुरबाड
विशेष वार्ता पत्र
दिनांक २२/११/२०२६.
मुरबाड (प्रतिनिधी):
समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देशाने मुरबाड येथील कुणबी भवन येथे 'फलज्योतिष्य आणि भोंदूगिरी विरोधी संघर्ष परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळ (मुरबाड) यांच्या सौजन्याने तसेच शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित 'विवेक जागर संस्था' आणि 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' (जिल्हा ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य प्रधान सचिव मा. आरतीताई नाईक या होत्या, तर परिषदेचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्री. सुभाष गोटीराम पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटनपर भाषणात व मान्यवरांशी संवाद साधताना श्री. सुभाष गोटीराम पवार यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन, फलज्योतिष्य व भोंदूगिरीला आळा घालणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, विवेकवादी विचारसरणीचा प्रसार करणे आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण परिषदेला मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिनजी हुंदाळकर, श्री. गणपत तात्या विशे, डॉ. सुषमाताई बसवंत, प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, श्रीमती सुशीलाताई मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, नागरिक तसेच महिलांची लक्षणीय आणि उत्स्फूर्त उपस्थिती होती.
📲Get App