🔥 TRENDING मथुरा के मांट में मिशन शक्ति टीम की सर... अजमेर ज़िला परिषद वार्ड‑2 में सुशील ने... छठ महापर्व सम्पन्न होते ही रेलवेस्टेशन... ਜਲੰਧਰ ਵਿਖੇ ਸਤਿਸੰਗ ਘਰ ਪਹੁੰਚੇ ਡੇਰਾ ਬਿਆਸ... અમરેલી મોંધવારીના મુદ્દે આમ આદમી પાર્ટ... Cyclone Akvan Crosses Odisha Coast, Wi...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोर तालुक्यातील सहा मतदान केंद्रांवर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणारl

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 23 Oct 2026, 01:06 PM 👁 162
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्याच्या भोर तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी एकूण सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, विविध उमेदवारांमध्ये निवडणूक लढवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भोर शहरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि नसरापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा वापर करण्यात येणार असून, येथे पदवीधर मतदानासाठी प्रत्येकी दोन आणि शिक्षक मतदानासाठी एक असे एकूण सहा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

मतदारसंख्येचा विचार करता, भोर तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी एकूण २ हजार ८४ मतदार नोंदणीकृत आहेत. तर, शिक्षक मतदार संघासाठी एकूण ३६५ मतदार मतदान करणार आहेत.

या निवडणुकीत उमेदवारांची मोठी फळी रिंगणात असून, पदवीधर मतदार संघासाठी ४७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच, शिक्षक मतदार संघासाठी ३० उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
📲Get App