🔥 ट्रेंडिंग મોડાસા, દેવરાજ ધામની ટાયર દુકાનમાં ભયં... पंजाब के सीएम के पूर्व ओएसडी ने कांग्र... एमपी लोकायुक्त ने 108 एंबुलेंस बिल सत्... शहडोल में 870 ग्राम प्रीमैच्योर बच्ची... एमपीएस शोधार्थी ने 331 शवों का विश्लेष... બનાસકાંઠા જિલ્લામાં અંબાજી મંદિરમાં આસ...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

यावल : शेतमजुरी करून परतणाऱ्या ११ महिलांना मारहाण करून दागिने लुटल्याचा गंभीर आरोप; पोलीस ठाण्यात लेखी तक्रार....!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 अक्टू. 2026, 03:52 PM 👁 20
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनीधी

यावल, जि. जळगाव - शेतात दिवसभर कष्ट करून घरी परतणाऱ्या महिलांना अडवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने तोडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ११ महिलांनी एकत्रितपणे यावल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तक्रार अर्जात नमूद माहितीनुसार, ही कथित घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. शेतमजुरी आटोपून महिला घरी जात असताना विनाकारण वाद घालून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या दरम्यान अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने तोडून नेण्यात आले किंवा फेकून देण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीत भालशिव येथील रहिवासी रामदास नामदेव कोळी यांच्या मालकीचे MH 19 BB 0462 क्रमांकाचे वाहन असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोणतेही सबळ कारण नसताना हा प्रकार घडल्याने महिलांना शारीरिक दुखापत, मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

तक्रारदार महिलांची नावे -
या तक्रार अर्जावर उषाबाई लालसिंग पाटील, सीमा मुरलीधर पाटील, प्रतिभा मुरलीधर पाटील, ज्योती दिलीप पाटील, शोभाबाई दिलीप पाटील, राधाबाई शिवाजी बेलदार, रेखाबाई मनोज पाटील, शारदाबाई सतीश महाजन, उषाबाई नथू पाटील, उज्ज्वलाबाई विजय भगत आणि इंदुबाई राजेंद्र पवार अशा ११ महिलांच्या सह्या आहेत.

सदर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांचे जबाब नोंदवावेत आणि पुराव्यांची पडताळणी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी महिलांनी केली आहे. आरोपांची सत्यता पडताळून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ११ महिलांनी एकत्रित तक्रार दाखल केल्याने यावल पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या कथित घटनेमागील नेमके कारण काय आणि दागिन्यांबाबत नेमके काय घडले, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
📲Get App