🔥 TRENDING ଶୀତ ଅଧିବେଶନର ପ୍ରଥମ ଦିନରୁ ହଙ୍ଗାମା; କୋଟି... Mother and Two Young Sons Killed in Su... NEHU to Hold 28th Convocation on Dec 1... Meghalaya Unveils 250 Luxury Tented St... Meghalaya Bus Drivers Plan Peace Rally... अररिया में आभूषण की दुकान से एक करोड़...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

येरगी ग्रामपंचायतचा राज्यस्तरीय बाल संसदेत डंका

✍️ Reporter: Jawed Ahemad 🗓 18 Nov 2026, 02:13 PM 👁 28
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
*येरगी ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय बालसंसदेत डंका!*
# येरगीची बालपंचायत सरपंच कु. रुद्राणी चेंडके ची राज्य बालसंसदेसाठी निवड #
#दुष्काळाचा प्रश्न राज्यस्तरीय व्यासपीठावर मांडणार!#

देगलूर: गावाच्या विकासाची चर्चा आता केवळ मोठ्या व्यासपीठावरच नव्हे, तर चिमुकल्यांच्या आवाजातूनही होणार आहे. बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि गावाच्या विकासातील त्यांचा सहभाग यांना प्राधान्य देणाऱ्या राज्यस्तरीय बालसंसद उपक्रमात देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी ग्रामपंचायतीने मानाचा ठसा उमटविला आहे. नांदेड जिल्ह्यातून येरगी ग्रामपंचायतीची या उपक्रमासाठी निवड झाल्याने संपूर्ण देगलूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ महाराष्ट्र, यशदा पुणे आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे राज्यस्तरीय बालसंसद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण व्यासपीठावर येरगी गावाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी बालपंचायत सरपंच कु. रुद्राणी नरसिंग चेंडके यांना मिळाली आहे.

#दुष्काळाचा प्रश्न राज्यस्तरीय व्यासपीठावर मांडणार!#

या बालसंसदेतील विशेष बाब म्हणजे कु. रुद्राणी नरसिंग चेंडके या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रतिनिधी म्हणून दुष्काळ या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार आणि प्रश्न मांडणार आहेत. ग्रामीण भागातील दुष्काळाचा परिणाम, पाणीटंचाई, त्याचा बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे त्या राज्यस्तरीय व्यासपीठाचे लक्ष वेधणार आहेत.

यासोबतच येरगी गावातील बालकांच्या समस्या, अपेक्षा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि गावाच्या विकासासंदर्भातील प्रश्नही त्या मांडणार आहेत. त्यामुळे येरगी गावातील बालकांचा आवाज पुण्यातील राज्यस्तरीय बालसंसदेत पोहोचणार आहे.

विशेष म्हणजे, नांदेड जिल्ह्यातून येरगी ग्रामपंचायतीची झालेली निवड ही ग्रामीण भागातील बालनेतृत्वाला मिळालेली एक मोठी संधी आहे. तेलंगणा आणि कर्नाटक च्या सीमेवर असलेल्या एका गावातील
बालप्रतिनिधीला विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही संपूर्ण गावासाठी नव्हे तर नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

#चिमुकल्या नेतृत्वाला राज्यस्तरीय संधी!#

आजच्या बालकांमध्ये उद्याचे सक्षम नेतृत्व दडलेले आहे. त्यांना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातूनही सक्षम नेतृत्व घडू शकते, याचे येरगी ग्रामपंचायत हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

#सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षकांचे मोलाचे योगदान!#

येरगी ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय यशामागे सरपंच संतोष पाटील येरगीकर, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बालपंचायत पदाधिकारी व सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

गावातील बालकांच्या हक्कांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी बालस्नेही वातावरण निर्माण करणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

येरगी ग्रामपंचायतीची ही निवड गावासाठी गौरवाची, देगलूर तालुक्यासाठी अभिमानाची आणि नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बाब ठरली आहे.

लहान वय, मोठी जबाबदारी आणि राज्यस्तरीय व्यासपीठावर विभागासह आपल्या गावाचे प्रतिनिधित्व! येरगीच्या चिमुकल्या नेतृत्वाची ही भरारी निश्चितच प्रेरणादायी आहे. यासाठी रुद्राणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
📲Get App