🔥 ट्रेंडिंग “प्रिंका चौधरी ने 20+ बेटियों को सिखाए... कलेक्टर श्री पार्थ जायसवाल ने जनपद पंच... પાંચોટિયા ગામમાં બંધ મકાનમાંથી ૩.૨૬ લા... বিজেপি নেতা কৌস্তভ বাগচীর ব্যারাকপুরের... गरुण सेना परिवार में रिंकू पाठक को शाह... जिला प्रभारी डॉ. सत्येन्द्र सिन्हा ने...
30 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या अंधारात लाकडाची वाहतूक? जंगलातून लाकूड तोडण्याचे आवाज; वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद नाही!

✍️ रिपोर्टर: Doctor:PINTU PAUL 🗓 30 अक्टू. 2026, 04:21 PM 👁 11
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या अंधारात लाकडाची वाहतूक? जंगलातून लाकूड तोडण्याचे आवाज; वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद नाही!

विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या अंधारात लाकडाची वाहतूक? जंगलातून लाकूड तोडण्याचे आवाज; वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद नाही!
वाघ आणि हत्तींच्या भीतीमुळे पत्रकारांना जंगलात जाऊन छायाचित्रे काढणे शक्य नाही; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने स्वतः घटनास्थळी पाहणी करावी.
गडचिरो

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या वेळी ट्रक व टेम्पोमधून लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती समोर येत असून, या प्रकाराची अधिकृत माहिती वनविभागाला देण्यासाठी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित वनअधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, घोट परिसरातील जंगलातून सायंकाळच्या सुमारास लाकूड तोडण्याचे आवाज ऐकू येत असल्याचे निदर्शनास आले. या जंगल परिसरात वाघांचा वावर तसेच हत्तींच्या कळपाची भीती असल्यामुळे पत्रकारांनी स्वतः जंगलात प्रवेश करून छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढण्याचे धाडस केले नाही. स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, या सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम अहेरी तालुक्यातील वनरक्षक (Forester) प्रांजय वडेट्टीवार यांच्याकडे DFO/RFO यांचे संपर्क क्रमांक मागितले असता, त्यांनी नंतर देतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.
त्यानंतर वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर फोन करण्याचा प्रयत्न केला; परंतु फोन लागला नाही.
अखेर दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी उपवनसंरक्षक (Sub-Divisional Forest Officer), आलापल्ली यांच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मेळेलवार यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी प्रथम पत्रकाराचे परिचयपत्र दाखविण्यास सांगितले. त्यानुसार WhatsApp द्वारे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर परिचयपत्र पाठविण्यात आले. मात्र, त्यानंतरही आकाश मेळेलवार यांनी फोन उचलला नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर उपवनसंरक्षक, आलापल्ली यांच्या कार्यालयाकडून DCF आलापल्ली यांचा संपर्क क्रमांक मिळवून फोन करण्यात आला. मात्र, तेथेही फोनला प्रतिसाद मिळाला नसल्याचा अनुभव आला. शेवटी एकच प्रश्न — जंगल वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन शासनाला माहिती दिली, तर त्या माहितीची दखल घेण्याची जबाबदारी कोणाची? वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला असताना वनविभागाचे अधिकारीच संपर्काबाहेर राहिले, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे?
वन वाचवा, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा!
प्रसिद्धीसाठी : स्वतंत्र भारत पक्ष – शेतकरी संघटना
डॉ. पिंटू दयाल पाल

ली | प्रतिनिधी

📲Get App