🔥 TRENDING Gem Granite's Veeramani Identified as... Vallur Thermal Power Project: Latest U... Tamil Nadu Faces Political Row Over Pr... મુંબઈના કોસ્ટલ રોડ પર BMW કાર ફ્લાયઓવર... Ukrainian MBBS Student Challenges NMC'... ਵਿਕਾਸ ਲਈ 8 ਲੱਖ ਰੁਪਏ ਚੈੱਕ, ਵਿਧਾਇਕ ਦਿਨੇਸ...
20 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
विकासाचा नवा पॅटर्न' वाढदिवस विशेषांकाचे आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते शानदार प्रकाशन.

विकासाचा नवा पॅटर्न' वाढदिवस विशेषांकाचे आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते शानदार प्रकाशन.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 20 Sep 2026, 02:05 PM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विकासाचा नवा पॅटर्न' वाढदिवस विशेषांकाचे आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते शानदार प्रकाशन!मुरबाड (ठाणे):तालुक्यात झालेल्या अभूतपूर्व विकासकामांचा वेध घेणाऱ्या आणि पत्रकार शंकर करडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'विकासाचा नवा पॅटर्न' वाढदिवस विशेषांक २०२६ चे आज २० सप्टेंबर २०२६ रोजी आमदार श्री किसनजी कथोरे यांच्या हस्ते भव्य प्रकाशन करण्यात आले.आमदार किसनजी कथोरे यांनी मुरबाड तालुक्यात राबवलेल्या विविध विकासकामांची आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांची सविस्तर माहिती या विशेषांकाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्यात आली आहे. सर्व प्रमुख मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.या जाहीर कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ पत्रकार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील पत्रकार बांधवांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत अंकाला भरघोष प्रोत्साहन दिले. "माणसांचा सहभाग, तालुक्याचा विकास!" हा सकारात्मक संदेश देणारा हा विशेषांक तालुक्याच्या प्रगतीचे एक नवे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.📰 रिपोर्टर काशिनाथ देसले (जिल्हा रिपोर्टर, ठाणे)किशोर पवार (तालुका रिपोर्टर, मुरबाड
📲Get App