Agriculture
वाई गावातील शेतकऱ्यांना दुहेरी संकट: खरीप व रब्बी पिकांचे नुकसान, पाणी टंचाई
मंठा तालुक्यातील वाई गावातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीमुळे आणि पाणी टंचाईमुळे रब्बी हंगाम घेऊ शकत नाहीत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत हवी.
वाई गाव, मंठा तालुका, जालना जिल्हा – येथे शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पाणी टंचाईमुळे हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेणेही कठीण झाले आहे.
हळदी उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः मोठे आर्थिक संकट भोगावे लागले आहे. हळदी पिकासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च केला जातो, परंतु प्रतिकूल हवामानामुळे अपेक्षित उत्पन्न मिळण्याची खात्री राहिलेली नाही. या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि पुढील शेतीसाठी भांडवल आणणे अशक्य झाले आहे.
विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांमधील पाणीपातळी खालावत असल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पाणी उपलब्ध नसेल तर हरभरा, गहू, ज्वारी आणि इतर रब्बी पिकांची लागवड कशी करायची हे शेतकऱ्यांसाठी मोठे प्रश्न बनले आहेत. पेरणी केली तरी पिकांना पाणी कुठून द्यायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
श्रीयांश बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष प्रशांत अशोक प्रधान यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. मागण्या यामध्ये खरीप हंगामातील नुकसानीचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे, आर्थिक मदत, पीकविमा भरपाई, पिण्याचे पाणी व चारा उपलब्धता, ग्रामीण रोजगार योजनांची अंमलबजावणी आणि वाई गावासाठी जलसंधारण व पाणी उपलब्धतेचा दीर्घकालीन कृती आराखडा तयार करणे यांचा समावेश आहे.