🔥 TRENDING સુરતમાં ઈચ્છાપોરમાં ટ્રક ચોરીની કડક પક... एटा में कोतवाली नगर पुलिस व पिलुआ थाने... ಬಿಎಂಡಿಎ ಮೈತ್ರಿಕೂಟದ ಎ.ಪಿ. ರಂಗನಾಥ್, ಬೆಂಗ... J&K Government Approves Promotion of 9... Chief Minister Omar Swears in Four New... J&K Ministers Meet, Focus on Balanced...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या साखर वाटपाचा पारगाव शिंगवे येथे शुभारंभ..! पंचायत समिती सदस्या श्वेता किरण ढोबळे यांच्या हस्ते साखर वाटप; शेतकरी व सभासदांची उपस्थिती..!! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 27 Oct 2026, 09:53 PM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पारगाव शिंगवे : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मानला जाणारा विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर-आंबेगाव यांच्या वतीने साखर वाटपाचा शुभारंभ आज पारगाव शिंगवे गट कार्यालय येथे उत्साहात पार पडला. पंचायत समिती सदस्या सौ. श्वेता किरण ढोबळे यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे, प्रगतशील शेतकरी बजाबा ढोबळे, मारुती लोखंडे, दातखिळे सर, तानाजी लबडे, अर्जुन ढोबळे यांच्यासह परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक, कारखान्याचे सभासद आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.

विघ्नहर सहकारी साखर कारखाना हा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून, कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांशी जोडलेले नाते अधिक दृढ होत आहे. साखर वाटपाच्या शुभारंभामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

या वेळी उपस्थित मान्यवर, शेतकरी आणि सभासदांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. उत्साहपूर्ण वातावरणात साखर वाटपाचा शुभारंभ संपन्न झाला.
📲Get App