🔥 TRENDING Rajasthan Computer Instructor Result 2... Dhanteras 2026: City-wise Muhurat for... Rockstar Games to Give Away Free GTA 6... TN launches Rs 54 crore cocoon market... PM Modi to meet Indian Asian Para Game... Madhya Pradesh Police HQ reshuffles ei...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वडगावपीर परिसरातील १०० शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे मोफत वाटप...! चारा उत्पादनाला मिळणार चालना; १०० टक्के अनुदानावर ५०० किलो बियाण्यांचे वितरण...!! सुरेंद्र सोनवणे | पुणे प्रतिनिधी| Need 24 News

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 05 Nov 2026, 11:23 AM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

१०० शेतकऱ्यांना मका बियाण्यांचा आधार; मुरघास निर्मितीसाठी प्रशासनाचा पुढाकार!

( लोणी-धामणी ): आंबेगाव तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पुरेसा हिरवा चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने वडगावपीर येथे मका बियाणे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती आंबेगाव यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या सर्वसाधारण योजनेतून चारा उत्पादन वैरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वडगावपीर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील लोणी, खडकवाडी, वडगावपीर आणि मांदळेवाडी या चार गावांतील एकूण १०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ किलो याप्रमाणे एकूण ५०० किलो मका बियाण्याचे १०० टक्के अनुदानावर वितरण करण्यात आले.

या बियाणे वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार असून पशुपालन व्यवसायाला बळकटी मिळणार आहे.

दरम्यान, लाभार्थी पशुपालक शेतकऱ्यांनी मिळालेल्या बियाण्याची त्वरित पेरणी करून चारा उत्पादन घ्यावे व मुरघास तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रेरणा मुळूक, बबन पानसरे, पशुसखी सोनाली खंडागळे, ज्योती वाळुंज, अर्चना रणपिसे, प्रियंका आदक यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App