🔥 TRENDING Nana Patekar Dies; Son Arrives at Goa... Mid-Day Releases 2026 Delhi‑Goa Travel... मैं किसी दल का प्रत्याशी नहीं, जनता का... Sericulture poised to lift Manipur far... 60-year-old Man Killed in Train Collis... Sand Artist Madhurendra Kumar Carves N...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

.ऊर्दू माध्यमाच्या शाळेती ल शिक्षकांना कथित मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये नोंदवलेल्या खटल्यात सतत अनुपस्थित राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना फटकारले आहे.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 08 Oct 2026, 03:14 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
Mumbai :
ऊर्दू माध्यमाच्या शाळेती ल शिक्षकांना कथित मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये नोंदवलेल्या खटल्यात सतत अनुपस्थित राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना फटकारले आहे.
Mumbai : ...तर महापौरांविरोधात वॉरंट जारी करू! न्यायालयाचा इशारा
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक ८/१०/२०२६.
(विशेष वृत्त मुंबई )
मुंबई : ऊर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये नोंदवलेल्या खटल्यात सतत अनुपस्थित राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना फटकारले आहे. न्यायालयाने त्यांच्यावर १ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास त्यांचा जामीन रद्द करून वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तावडे यांचे वकील दुर्गा राजपूत यांनी रितू तावडे यांच्या वैयक्तिक उपस्थितीपासून कायमस्वरूपी सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. तावडे या मुंबईच्या प्रथम नागरिक असून पालिकेच्या विविध कार्यक्रमांमुळे त्यांचा दिवस अतिशय व्यस्त असतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, हा खटला ७ वर्षे जुना आहे या मुद्द्यावर सरकारी वचक इक्बाल सोळकर यांनी या अर्जाला विरोध केला. यापूर्वीच्या सुनावणीतही तावडे यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने त्यांच्यावर ३०० रुपयांचा दंड ठोठावला होता आणि त्यांना बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते, परंतु त्या पुन्हा हजर राहिल्या नाहीत, असेही निदर्शनाला आणून देण्यात आले. तथापि, न्यायालयाने तावडे यांचा एका दिवसासाठी वैयक्तिक उपस्थितीपासून सूट देण्याचा अर्ज मान्य केला.
न्यायालयाची ताकीद:
न्यायालयाने म्हटले की, २०१७ मध्ये आरोपपत्र (चार्जशीट) दाखल झाले आणि २०१९ मध्ये हे प्रकरण या न्यायालयात वर्ग झाले. आरोपीची सततची अनुपस्थिती खटला लांबवण्याची त्यांची प्रवृत्ती दर्शवते. अद्याप आरोप निश्चित झालेला नाही. मात्र, वकील राजपूत कायमस्वरूपी सूट मिळण्याची विनंती करत आहेत. आरोपीच्या सामाजिक स्थितीचा विचार करून अजामीनपात्र वॉरंट जारी केले जात नाही आणि खटल्याची सुनावणी जलद गतीने चालवण्यासाठी सहकार्य केले जाईल, ही अपेक्षा आहे.'
📲Get App