🔥 TRENDING ગુજરાત પોલીસ 21 સપ્ટેમ્બરથી 5 ઓક્ટોબર... सोमनाथ मंदिर बम धमकी આખરે રહસ્ય ખૂલ્યું હત્યા બાદ બળાત્કારન... મેઘરજમાં અપોલો પાસે દારૂ ભરેલી કાર જપ્... મેઘરજમાં અપોલો પાસે દારૂ ભરેલી કાર જપ્... ઉજજૈનના પરિવારનું દુર્ભાગ્ય: ચોટીલા નજ...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Business

UPI शुल्काच्या चर्चेमुळे ठाणे जिल्ह्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन; दुकानांमधून क्यूआर कोड हटवले, गणेशोत्सवाच्या खरेदीत ग्राहकांची तारांबळ.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 21 Sep 2026, 08:32 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

UPI शुल्काच्या चर्चेमुळे ठाणे जिल्ह्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन; दुकानांमधून क्यूआर कोड हटवले, गणेशोत्सवाच्या खरेदीत ग्राहकांची तारांबळ!

24News वृत्तसेवाठाणे जिल्हा प्रतिनिधी: काशिनाथ देसलेमुरबाड तालुका प्रतिनिधी: किशोर पवारदिनांक: २१/०९/२०२६यूपीआय शुल्काच्या चर्चेने ठाणे जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा संताप; दुकानांमधून क्यूआर कोड हटवल्याने सणासुदीत ग्राहकांची तारांबळ!ठाणे/मुरबाड:सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, दुसरीकडे मात्र युपीआय (UPI) व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेने व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संभाव्य आर्थिक भाराच्या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, मुरबाड आणि इतर प्रमुख बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी एक आक्रमक पाऊल उचलले आहे. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांमधील युपीआय पेमेंटचे बोर्ड आणि क्यूआर कोड थेट हटवण्यास सुरुवात केली आहे.सध्या राज्यात गणेशोत्सवाचा सण मोठ्या धुमधडाक्यात सुरू असून घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. डिजिटल इंडियाच्या काळात बहुतांश ग्राहक आता खिशात रोकड न बाळगता केवळ मोबाईलच्या भरवशावर खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या डिजिटल बहिष्कारामुळे केवळ मोबाईल घेऊन बाजारात आलेल्या ग्राहकांची प्रचंड तारांबळ उडत आहे.२० हून अधिक व्यापारी संघटना आक्रमकमिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील आणि उल्हासनगरमधील जवळपास २० विविध घाऊक आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापारी संघटना या संभाव्य शुल्काविरोधात एकत्र आल्या आहेत. "ग्राहकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून युपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारणे चुकीचे आहे, यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होईल," अशी भावना व्यापारी व्यक्त करत आहेत.ग्राहकांना 'कॅश' बाळगण्याचे आवाहनदुकानदारांनी ऑनलाईन पेमेंट घेणे बंद केल्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांना ऐनवेळी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी एटीएम (ATM) केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे. सणासुदीच्या काळात खरेदीचा आनंद विरजण पडू नये, यासाठी आता "मोबाईलसोबत खिशात रोकड (कॅश) ठेवा आणि मगच बाजारात निघा," असा सल्लावजा इशारा ग्राहकांना दिला जात आहे. या वाढत्या वादामुळे डिजिटल व्यवहारांची सवय झालेल्या नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
📲Get App