🔥 TRENDING भोर मांढरदेवी रस्त्यावरील वनक्षेत्र हद... સ્ટેચ્યુ ઓફ યુનિટી ખાતે 'એકતા પ્રકાશ પ... Headlines ਘਰੇਲੂ ਕਲੇਸ਼ ਕਾਰਨ ਉੱਜੜ ਗਿਆ ਹੱਸਦਾ-ਖੇਡਦਾ... લાઠી તાલુકામાં સમાવિષ્ટ કુલ ૧૩ સેજામાં... હિંમતનગરમાં 'માં નો માંડવો 2026'માં ખે...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

उजनीत कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते भव्य देशी मत्स्यबीज संचयन सोहळा

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 18 Oct 2026, 10:40 AM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उजनी येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत देशी मत्स्यबीज संचयन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे उजनीतील मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळणार आहे.

उजनी, ता. इंदापूर
| उजनी जलाशयाच्या संवर्धनासाठी आणि स्थानिक मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "भव्य देशी मत्स्यबीज संचयन सोहळा" आज मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे शुभहस्ते मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे (मामा), कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर स्थानिक लोकप्रतिनिधी, BNHS चे अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय सोडले उजनीच्या पाण्यात?
या कार्यक्रमांतर्गत उजनी जलाशयात एकूण 32 लाख 21 हजार मत्स्यबीज आणि वनस्पती सोडण्यात आल्या:
22,00,000 - स्थानिक देशी माशांची बोचुकली
10,00,000 - देवन महसीर (टोर टोरा) - अत्यंत दुर्मिळ मासा
10,00,000 - भारतीय प्रमुख कार्प (रोहू, कतला, मृगल)
21,000 - स्थानिक पाणथळ वनस्पती

हा केवळ मत्स्यबीज सोडण्याचा कार्यक्रम नसून पाणथळ जागा पर्यावरण पुनर्स्थापना आणि मत्स्यव्यवसाय विकास चा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यामुळे उजनीतील देशी माशांचे प्रमाण वाढणार असून, स्थानिक भोई समाज व मच्छीमार बांधवांच्या रोजगाराला मोठा आधार मिळणार आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार. तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे गोरगरीब मच्छीमारांच्या पाठीशी पहिल्यापासून उभे आहेत.

यावेळी बोलताना मंत्री भरणे मामा म्हणाले की, "उजनी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. देशी माशांचे संवर्धन ही काळाची गरज आहे आणि या माध्यमातून शेतकरी आणि मच्छीमार दोघांनाही फायदा होणार आहे."
📲Get App