🔥 ट्रेंडिंग વાગરા તાલુકાના ઔદ્યોગિક વિસ્તાર દહેજમા... भारी बारिश के कारण कल स्कूल बंद, इकोनॉ... अमृतसर में गुरु के लंगर की बेअदबी पर ध... जालंधर में किसान ने रेल ट्रैक पर बैठकर... दिल्ली पुलिस ने 50 करोड़ की हेरोइन जप्... पूर्व नौकरशाहों के प्रतिनिधिमंडल ने चु...
05 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

उजनी धरणातील मच्छीमारांसाठी खाजगी ठेका पद्धतीचा रद्द

✍️ रिपोर्टर: Dilip Ghoyak Nagare 🗓 05 अक्टू. 2026, 05:55 PM 👁 52
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अखेर विजय झालाच उजनी धरणातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका रद्द हजारो मच्छीमारांच्या लढ्याला यश

अखेर विजय झालाच! उजनी धरणातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका रद्द; हजारो मच्छीमारांच्या लढ्याला यश

उजनी / सोलापूर - उजनी धरणातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. आज झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मच्छीमारी ठेका रद्द करणार असल्याचे सांगितले.

हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून उजनीच्या हजारो मच्छीमार बांधवांच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि निस्वार्थ लढ्याचा विजय आहे, अशी भावना उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण लढ्यात सातत्याने साथ देणारे कृषीमंत्री मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांचे मच्छीमार बांधवांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.
अधिकारी पदाधिकारी सर्व गोरगरीब मच्छीमार समाजाला सोबत घेऊन चालणारे नेते यांचेही मानले आभार

हा लढा सर्वांचा होता!

अभियानाने स्पष्ट केले की, हा लढा कोणामुळे एकामुळे जिंकला नाही. या लढ्यात इंदापूर, भिगवण व उजनीच्या अवतीभोवती असणारे छोटे-मोठे व्यापारी, आडतदार, तोडणारे, बर्फ कारखानदार, तळमळीचे मच्छीमार, सामाजिक कार्यकर्ते, अन्नदाता, सर्व वर्गनिदार, पत्रकार बंधू, मीडिया, युट्युबवाले, वकिल बंधू, सर्व मार्गदर्शक, पाठपुरावा करणारे, निवेदन कागद पत्रे अभ्यासक आणि मच्छीमार व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिक या सर्वांच्या एकजूट व निस्वार्थी लढ्यामुळे आपण विजय मिळवला आहे. हा लढा कोणाच्या नावासाठी नव्हता तर आपल्या प्रत्येकाच्या रोजीरोटीचा होता.
"आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे आपण जिंकू शकलो"
या निर्णयामुळे उजनी परिसरातील हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला असून मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रतिनिधी. दिलीप नगरे
need24 news
-
#UjaniDam #Ujani #Machhimar #Solapur #Indapur #Bhigwan
📲Get App