🔥 TRENDING হুগলি জেলায় ক্যারিয়ার কাউন্সেলিং সেশন... Raavan: Official Trailer Released, Tea... Jailer 2 Trailer Review: Director Nels... Paach Futacha Bachchan: Official Trail... Indian Airlines Add Flights, Reschedul... Bombay HC Goa Bench Criticises EC Over...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

उजनी धरणातील मच्छीमारांनी खाजगी ठेका रद्दीबद्दल दत्तामामा भरणे यांचे आभार मानले

✍️ Reporter: Dilip Ghoyak Nagare 🗓 06 Oct 2026, 04:58 PM 👁 32
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उजनी धरणातील मच्छीमारांनी खाजगी ठेका पद्धत रद्द झाल्याबद्दल दत्तामामा भरणे यांचे आभार व्यक्त केले.

उजनी धरण बातमी - विशेष रिपोर्ट

उजनीच्या मच्छीमार बांधवांचा मामांनी शब्द पाळला! खाजगी ठेका रद्द झाल्याने हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद

इंदापूर / उजनी - उजनी धरण परिसरातील गोरगरीब मच्छीमार बांधवांच्या हक्काच्या लढ्याला अखेर यश आले आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तामामा भरणे यांनी दिलेला शब्द पाळत उजनी धरणातील खाजगी मासेमारीचा ठेका रद्द करून घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार कुटुंबांची रोजीरोटी, त्यांची भाकर वाचली असून संपूर्ण उजनी परिसरात मच्छीमार बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उजनी धरणात खाजगी ठेकेदारी पद्धत सुरू झाल्याने स्थानिक, पारंपारिक आणि गोरगरीब मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या हक्काचे जलाशय हातून जात असल्याने मच्छीमार बांधवांनी आ. दत्तामामा भरणे यांच्याकडे धाव घेतली होती.

मच्छीमारांच्या या मागणीसाठी मामांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. इंदापूरसह उजनी परिसरातील मच्छीमारांच्या प्रश्नासाठी ते खंबीरपणे उभे राहिले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय:

उजनीतील खाजगी मासेमारीचा ठेका रद्द
मच्छीमार बांधवांच्या मागणीसाठी मामांचा सातत्याने पाठपुरावा
हजारो मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन वाचविले
इंदापूरसह उजनी परिसरातील मच्छीमारांच्या प्रश्नासाठी मामा खंबीरपणे उभे राहिले

ठेका रद्द झाल्याची बातमी समजताच उजनी धरण परिसरातील सर्व मच्छीमार बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. "मामांनी आमच्या तोंडची भाकर मिळवून दिली, आमचा वाली फक्त दत्तामामा" अशा भावना मच्छीमार बांधवांनी व्यक्त करत आ. दत्तामामा भरणे यांचे जाहीर आभार मानले व त्यांचे अभिनंदन केले.
"उजनी धरण हे आमच्या मच्छीमारांचे जीवन आहे. इथल्या गोरगरीब मच्छीमारावर अन्याय होऊ देणार नाही, हा शब्द मी दिला होता आणि तो पाळला. माझ्या मच्छीमार बांधवांच्या हक्कासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन." - अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निर्णयामुळे इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील हजारो मच्छीमार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रतिनिधी .दिलीप नगरे
Need24 news.
📲Get App