🔥 TRENDING बॉर्डर इलाके में चुनावी यात्रा के दौरा... મહીસાગર જિલ્લામાં વકીલોની અચોક્કસ મુદત... जैसलमेर हजुरी समाज के मुखिया श्री गुमा... DSSSB ने विभिन्न पदों के परिणाम 26 अक्... गयाजी में ड्रोन हेलीकॉप्टर से तीर्थयात... DK Shivakumar Alleges 'Criminal Conspi...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
उजनी धरणातील खासगी मत्स्यव्यवसाय ठेका पद्धत कायमस्वरूपी रद्द

उजनी धरणातील खासगी मत्स्यव्यवसाय ठेका पद्धत कायमस्वरूपी रद्द

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 05 Oct 2026, 06:22 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जलसंपदा विभागाने उजनी धरणातील खासगी मत्स्यव्यवसाय ठेका पद्धत कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

उजनी धरणातील खासगी मत्स्यव्यवसाय ठेका पद्धत कायमस्वरूपी रद्द

पुणे जिल्हा प्रतिनिधी : 5 ऑक्टोंबर 2026 महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली उजनी धरणातील खासगी मासेमारी ठेका पद्धत रद्द करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. जलसंपदा विभागाने उजनी धरणातील खासगी मत्स्यव्यवसाय ठेका पद्धत कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री. दत्तात्रेय भरणे मामा यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे माननीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब व माननीय श्री विखे पाटील साहेब यांचे विशेष आभार

या निर्णयाचे मच्छीमार बांधव, आडतदार, व्यापारी तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी स्वागत केले आहे. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय व सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांचे समितीने, पत्रकार बांधव यांचे आभार मानले आहेत.
📲Get App