🔥 TRENDING સુરતમાં ટેક્સટાઇલ કામદારોની રવિવારની ર... ശക്തമായ ഇടിമിന്നലിൽ വീടിന് വ്യാപക നാശന... ब्रेकिंग न्यूज़! चारामा के बड़ेगौरी से... CTM ડબલ ડેકર ઓવરબ્રિજ પર 30 વર્ષીય યુવ... BRS Calls for ED Investigation into Te... Telangana consumers to bear additional...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

उजनी पाणीसाठा 87% – तरीही चिंता कायम

✍️ Reporter: Dilip Ghoyak Ngare 🗓 05 Oct 2026, 01:20 PM 👁 52
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उजनीच्या पाणीसाठ्याची सध्याची पातळी 87% असूनही स्थानिक बळीराजांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

२. उजनीची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे! एकूण साठा ८७.६८% असला तरी उपयुक्त साठा चिंताजनक

---इंदापूर, दि. ५ -प्रतिनिधी दिलीप नागरे

उजनी धरणातील पाणीपातळीत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून, धरणातील एकूण पाणीसाठा सध्या ८७.६८ टक्के असला तरी उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्या उजनीमध्ये केवळ ४६.९७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

उजनी धरणातून सध्या विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून - २१० क्युसेक्स
दहेगाव उपसा सिंचन योजनेतून - ११० क्युसेक्स
बोगद्यातून - ६०० क्युसेक्स
तर कॅनलमधून - २६५० क्युसेक्स

इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.

धरण १०० टक्के भरू शकले नाही - कारण काय?

यंदाच्या पावसाळ्यात उजनीच्या थेट पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. पुणे आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरील भागात झालेल्या पावसामुळे उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आणि धरणाची पाणीपातळी समाधानकारक झाली होती. मात्र, धरण शंभर टक्के भरण्यापूर्वीच काही प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही.

सध्या धरणातील एकूण साठा समाधानकारक दिसत असला तरी उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खाली गेल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाणीपातळीतील हीच घट कायम राहिल्यास आगामी उन्हाळ्यात उजनीवर अवलंबून असलेल्या शेती, पिण्याच्या पाणी योजना आणि विविध प्रकल्पांसमोर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे
📲Get App